पंढरपूर

बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींचा निधी तर मग मंगळवेढ्याच्या 35 गावच्या योजनेसाठी तरतूद का नाही ? :आ. प्रशांत परिचारक

मंगळवेढा– मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे गाजतोय, त्याची चर्चा होते मात्र ठोस निर्णय होत नाही. राज्याच्या बजेटमध्ये बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटी ₹ तरतूद करण्यात आली आहे. तिथे एवढ्या तरतुदीची गरज आहे का? असा सवाल आमदार प्रशांत परिचारक यांनी विचारला.
मंगळवेढयाच्या 35 गावांना पाणी देण्यासाठी निधी नाही का? 2014 गेलं आता 2024 जवळ आले तरी म्हणे सर्व्हे चालू आहे. पाइपलाइनमधून आता शेतीला पाणी देणार..म्हणे. किती दिवस जनतेची फसवणूक करणार हे लोक? असा प्रश्न परिचारक यांनी विरोधकांना विचारला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा 35 गावच्या पाणी प्रश्न पुन्हा प्रचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता पक्ष, रिपाइं आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ निंबोणी या गावी सभा झाली. यात आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले ,परिचारक कुटुंबावर कायम आरोप होत आलाय, त्यामुळे आम्ही ठरवले यंदा माघार घ्यायची. तुमच्या हक्काच्या माणसाला संधी द्यायची, दोघांच्या मत विभाजनात तिसऱ्याला फायदा का? 67 टक्के मार्क पडलेला उमेदवार नापास झाला, 33 टक्के मार्क मिळालेला माणूस पास होतो, त्यामुळे तुमच्या समोर समाधान आवताडे यांना विजयी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
भाजपा जिल्हा निरीक्षक बाळासाहेब भेगडे म्हणाले, राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार महाविकासचे सरकार नसून महावसुली सरकार आहे. या सभेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, शशिकांत चव्हाण, येताळा भगत,गौरीशंकर बुरकुल, औदुंबर वाडदेकर, व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, सचिन शिवशरण,. पप्पू काकेकर, सुधाकर मासाळ, प्रदीप खांडेकर, चंद्रकांत पडवळे,जमदाडे सर, युन्नूस शेख, आझाद दारुवाले शिवाजी पटाप, तसेच त्या त्या गावचे सरपंच, प्रमुख कार्यकर्ते उपस्थिती होते.

Related posts