लातूर

लातूर-टेंभुर्णी ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी 79 कोटी 36 लाख निधी मंजुर. ; खा. ओमराजे निंबाळकर यांची माहिती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा मुख्य मार्ग असलेला (N.H-548 C/NH-63) टेंभुर्णी – कुर्डुवाडी – बार्शी – येडशी हा आहे. हा महामार्ग लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या महामार्गाच्या 163 कि.मी. पैकी 101 कि.मी. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातुन जातो. या महामार्गाची स्थिती वाहतुकीस अनुकूल नसल्याने टेंभूर्णी-बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत होते.

त्याअनुषंगाने उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांच्या कडे लातूर- मुरुड- ढोकी-येडशी- कुर्डुवाडी- टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग मराठवाडयातून विदर्भाकडे तसेच पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबईला दळणवळण करणेकरीता वापरण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्ता होऊन अपघाताने जिवीत व वित्त हानी मोठया प्रमाणावर होत असल्याचे पत्रान्वये मा.मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. 21 नोव्हेंबर 2019 रोजी तारांकित प्रश्न क्र.71 नुसार अधिवेशन मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.09 मार्च 2021 रोजी नियम 377 च्या माध्यमातून मा.मंत्री महोदयांचे लक्ष वेधले होते. व रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.

सदर रस्त्यांच्या मंजुरीसाठी व निधीसाठी देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी, केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन:निर्माणासाठी पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्याला यश आले असून लातूर- मुरुड- ढोकी- येडशी- कुर्डुवाडी- टेंभुर्णी ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी 49 कोटी 12 लाख.

बार्शी-येडशी-मुरुड-लातूर- सग्रोली ह्या महामार्गासाठी 30 कोटी 24 लाख असे एकूण 79 कोटी 36 निधी मंजुर झाला आहे. त्याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांचे आभार मानले.

Related posts