तुळजापूर

जैन युवा मंच च्या चिमुकल्या मावळ्यांनी साकारली “जंजिरा किल्याची” सुंदर प्रतिकृती.

पुरूषोत्तम विष्णु बेले,
प्रतिनिधी/नळदुर्ग

दिवाळी आली की लहान मुलांना सुट्टीत गड किल्ले बनवण्याची हौस लय भारी .शहर असो किंवा खेडेगाव सर्वत्रच बच्चे कंपनी गड किल्ले बनवण्याचे प्रयत्न करतात. गड किल्ले बनवण्यासाठी विटा ,दगड ,माती, किल्लेदार , शिवाजी राजांची मूर्ती, पुतळा, सैनिक, पताका , रंग ,भगवा झेंडा, लाईटच्या माळा, पाणी असे अनेक प्रकारचे साहित्य जमून ठेवतात ,मातीत पाणी घालून तिला घट्ट बनवले जाते. विटा वर विटा रचल्या जातात. गडाला मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार व त्याला असलेली सुंदर कमान बनविली जाते .गड-किल्ल्यांवर बुरुजांचे अस्तित्व दाखविले जाते.

किल्ल्यांवर पहारा देणारे सैनिक मंडळी जागोजागी उभा केले जातात. मुख्य दरवाजा जवळ किंवा बुरुजा शेजारी मोठ्या तोफा ठेवल्या जातात. गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी पायऱ्या दाखविल्या जातात .काहीवेळा हुबेहूब पन्हाळागड, प्रतापगड किंवा राज्यातील गडाची प्रतिकृती साकारली जाते .यातून त्यांची विचार करण्याची दृष्टी दिसून येते, प्रतिभा दिसून येते. या कामासाठी एक-दोन, चार-पाच असे कितीतरी बच्चे मंडळीतील लहान मुले -मुली प्रयत्न करतात .गल्लीतील किंवा गावातील वातावरण हे छोटे मावळे शिवमय बनवतात. त्यांच्या प्रयत्नांना खरोखरच दाद द्यावीशी वाटते. गड किल्ल्यांविषयीचे प्रेम आजही आपल्याला दिसून येते. व इतिहास आजच्या पिढीलाही माहितगार असल्याचे जाणवते. जेव्हा पूर्ण किल्ला तयार होतो तेव्हा हीच छोटी मंडळी शिवरायांचे वारसदार असल्याचे वाटते.
दिवाळी निमित्य असाच एक सुंदर प्रयत्न नळदुर्ग शहर शिवसेना आयोजित किल्ला बांधणी स्पर्धेत सहभागी घेऊन जैन गल्ली नळदुर्ग येथील छोटी छोट्या मावळ्यांनी “मुरुड जंजिरा” किल्याची सुंदर प्रतिकृती उभा केला आहे. या किल्ला बांधणी साठी मागील 4 दिवसा पासून सिद्धांत पाटील, अक्षत आवटे व केवल पाटील, यांच्या मार्गदशना खाली जैन बाल मंच यांनी मेहनत घेतली आहे.

Related posts