सोलापूर शहर

धाडसी तरुणी करते कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

कोरोना विषाणू बाधेने रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचा अंत्यविधी करणे खूप कठीण काम आहे ,जोखमीचे आणि आपल्या जीवाशी खेळण्याचे काम सोलापुरात एक धाडसी तरुणी करतेय, टायगर कुमारी कविता चव्हाण असे या तरुणीचे नाव आहे, कविता ही टायगर ग्रुप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम करतेय, ही स्वतः कोरोना विषाणू ने मृत झालेलं मृतदेह हॉस्पिटल मधून घेऊन जाऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करतेय ,अश्या या धाडसी तरुणी कविता चव्हाण चा exclusive स्पेशल रिपोर्ट ही आहे धाडसी तरुणी कु. कविता चव्हाण ,शिक्षण कला पदवीधर शिक्षण पूर्ण करून टायगर ग्रुप या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक कामात थेट सहभाग , सामाजिक क्षेत्रातील कामाच्या आवडीने हे सामाजिक कामास सुरुवात,गेल्या 8 वर्ष पासून सामाजिक कामाला सुरुवात केलीय,सोलापुरात 12 एप्रिल पासून कोविड 19 साथ मोठ्या पसरली ,लॉक डाउन झाल्यानंतर बेसहारा असलेल्या शहरातील 1500 लोकांना सकाळ संध्याकाळ जेवण घालत होत्या ,यातून त्यांना कोविड संसर्गाचा व्यक्तीसाठी का। करायची इच्छा होती मात्र त्यांना प्रशासनाकडून परवानगी मिळत नव्हती गंभीर आजार त्यात ही तरुणी यामुळे प्रशासनही हतबल होते, अखेर कोरोना बाधित रुग्णावर अंत्यसंस्कार करणे सोलापूर महापालिकेला खूप जिकरीचे आणि जोखमीच काम होते, याला कर्मचारीही कचरत असल्याने पालिकेने सामाजिक संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले,या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत कोरोना बाधित मृतदेह वर अंत्यसंस्कार करण्यची तयारी टायगर ग्रुप च्या तरुणी कविता ने दर्शविली आणि पालिकेने परवानगीही दिली

कोरोना बाधित मृतांच्या मृतदेह जवळ फिरकण्यास प्रशासनाने मनाई केलेली होती ,त्यांच्या अंत्यसंस्कार साठी नातेवाईक ही मदत करीत नसत तसेच ते अंत्यसंस्काराला ही येत नाही ,मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी इतर व्यक्ती मिळत नसत,टायगर ग्रुप च्या सदस्य कु कविता चव्हाण यांना कोविड ने मृत झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळताच त्यांनी तातडीने काम सुरू केले,गेल्या दोन दिवसात त्यांनी कोविड 19 ने मृत झालेल्या चार मृतदेहाचे अंत्य संस्कार केलेत आपल्या जीवाची पर्वा न करताया कविता हे कोविड बाधित मृतदेह अंत्यसंस्कार करणे हे सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करतोय,तिने तरुणांना अश्या कठीण प्रसंगी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन कविता चव्हाण या तरुणीने केलाय

Related posts