दक्षिण सोलापूर

बोळकवठे येथे हरभरा शेतीशाळा संपन्न

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे येथे पिकावरील किड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पिकाची शेतकरी शेतीशाळा घेण्यात आली, यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी श्री आर.एस.माळी तालुका कृषि अधिकारी दक्षिण सोलापूर, श्री.डी.जी.राठोड कृषि पर्यवेक्षक दक्षिण सोलापूर १, कृषि सहाय्यक श्री.पी.ए.जाधव, जी.एस.कामटे व एस.जी.कोरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा पिक परस्थिती, किड-रोग ओळख व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, कामगंध सापळे व त्यांचे किड नियंत्रणात असणारे महत्व इ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषि अधिकारी दक्षिण सोलापूर श्री आर.एस.माळी यांनी महाडिबिटी पोर्टल वरील कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, रब्बी हंगाम पीक स्पर्धा विषयी माहिती देण्यात आली, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्र भेट देऊन पाहणी करण्यात आली, कामगंध सापळे बसवणे, पक्षी थांबे तयार करणे विषयी तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. यावेळी कृषि मित्र पद्मणा वाडी, राजकुमार हलकुडे, गुरुशांत पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक पी ए जाधव व आभार प्रदर्शन गुरुशांत पाटील यांनी केले.

Related posts