लोहारा

अर्थिक दुर्बल घटकांना सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात

पुरूषोत्तम विष्णु बेले
प्रतिनिधी

कोरोणा च्या वाढत्या प्रभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना,सिमेन्स गमेसा कंपनी व सेवावर्धिनी संस्था पुणे या संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धानोरी गावासह इतर गावातील लोकांना उद्योग करण्यासाठी आधार म्हणून शेळ्यांचा गट, प्रशिक्षण देऊन देण्यात आले. जत ( सांगली) भागातील व लोहारा ( उस्मानाबाद) भागातील 14 कुटुंबांना शेळीपालन प्रशिक्षण व लाभार्थ्यांना शेळी वाटप हा कार्यक्रम धानुरी या गावामध्ये लोकांच्या उदंड प्रतिसादाने संपन्न झाला.

प्रशिक्षक -पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. इम्रान पल्ला सर यांनी लाभार्थ्यांना शेळीपालन विषय खूप छान प्रशिक्षण दिले.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अभयसिंह बाबर (गमेंसा कंपनी साईट इंचार्ज), सेवावर्धिनी चे प्रकल्प समन्वयक चन्नविर बंकूर, ज्ञानू कांबळे (CSR Activity) समन्वयक ,गणेश जाधव सरपंच धानोरी,सुनिता पावशेरे सरपंच कलदेव निंबाळा,शंकर जाधव लोहारा जनकल्याण समीती कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम बेले,आदी जण उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिलकुमार राठोड प्रकल्प समन्वयक सेवावर्धीनी यांनी परिश्रम घेतले.

Related posts