अक्कलकोट

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी महाविद्यालयात विविध कौशल्याधिष्ठित डिग्री कोर्सेसला मान्यता प्राप्त.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून विद्यापीठ अनुदान आयोग
(युजीसी ) यांच्या एनएसक्युएफ या योजने अंतर्गत बॅचलर ऑफ व्होकेशनल इन बिझनेस अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, बी. व्होकेशनल इन फूड प्रोसेसिंग अँड टेक्नाॕलाॕजी, आणि बी.व्होक इन टूर आणि हाॕटेल मॕनेजमेंट या तीन वर्षाच्या कौशल्याधिष्ठित डिग्री कोर्सेसला मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

तीन्ही डिग्री कोर्सेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरसोलापूर विद्यापीठ , सोलापूर यांच्याशी संलग्नित असणार आहेत. जगातील प्रगत राष्ट्रांशी तुलना करता भारतामध्ये कौशल्य शिक्षण घेतलेल्या लोकांचे प्रमाण खुपच कमी आहे. त्यामुळेच विशिष्ठ व्यावसायासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याचे हेतूने युजीसी व मानव संसाधन मंत्रालय यांच्या पुढाकारातुन बी. व्होकेशनल अभ्यासक्रम संपूर्ण देशात राबविले जातात. या अभ्यासक्रमाची रचना 30% लेखी ज्ञान व 70%
प्रात्यक्षिक ज्ञान असे आहे. सामान्य पदवी अभ्यासक्रमापेक्षा बी. व्होकेशनल अभ्यासक्रम निवडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये लवचिकता ठेवण्यात आली आहे. जर एखादा विद्यार्थी आपला बी. व्होकेशनल कोर्स पूर्ण करण्यास असमर्थ असेल तर त्याला प्रथम वर्षाच्या यशस्वी समाप्तीनंतर पदविका (डिप्लोमा) किंवा द्वितीय वर्षाच्या यशस्वी समाप्तीनंतर वरीष्ठ पदविका (अॕडव्हान्सड डिप्लोमा ) देण्यात येईल. या व्यतीरिक्त प्रात्याक्षिक आधारीत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या व नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या तीन्ही कोर्सेसला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता किमान कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण असावा. सदर तीन्ही अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची अंतीम तारीख २० नोव्हेंबर २०२० असून पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. के. व्ही. झिपरे व समन्वयक डॉ. एस. के. मुरुमकर यांनी केले आहे.

या पञकार परिषदेस प्राचार्य डाॕ. किसन झिपरे, उपप्राचार्य दत्ताञय फुलारी, पर्यवेक्षक वैदेही वैद्य,
समन्वयक डॉ. एस. के. मुरुमकर, डाॕ. अंकुश शिंदे, प्रा. संध्या इंगळे, डाॕ. मधुरा गुरव, प्रा. अप्पासाहेब देशमुख, प्रा. दयानंद कोरे, डाॕ. भैरप्पा कोणदे, प्रा. प्रकाश सुरवसे उपस्थित होते.

Related posts