तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा विभाग

तुळजापूर – आज रोजी, हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता माँसाहेब जिजाऊ तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू, हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतूनच रयतेचे राज्य उदयाला आले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीपुढे रयत खंबीरपणे उभा राहू शकली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णाण केली. या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रुपात जिजाबाईंनी केली होती.
अशा जिजाबाईंच्या जयंतीनिमित्त आज विद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील महीला शिक्षिका श्रीमती पाटील मँडम, श्रीमती नाशे मँडम, श्रीमती तोडकरी मँडम व श्रीमती माने मँडम यांच्या हस्ते करण्यात आले.

अस म्हणतात, की कोणत्याही देशाचे भविष्य हे नेहमी तिथल्या तरुणांच्या हातात असते. विचारांनी प्रगल्भ, आणि उत्साहाने परिपूर्ण असे हे तरुण ज्या दिशेने काम करतात त्याच दिशेने देशाची वाटचाल होत असते. भारताची लोकसंख्या पाहिल्यास यातही सर्वाधिक तरुण वर्ग आहे. याच वर्गासाठी दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर युवा दिवस साजरा केला जातो, हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते, विवेकांनद यांनी अगदी कमी वयातच आपल्या विचारांनी जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा मिळावी याकरिता हा दिवस निवडला गेला आहे. आज,स्वामी विवेकानंद यांची 158वी जयंती आहे, या निमित्ताने आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या युवा दिनाच्या निमित्ताने आज विद्यालयात पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


विश्व हिंदी दिवसानिमित्त विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक श्री पांचाळ देविदासराव व डॉ. विजय वडवराव यांचा विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर व श्री सुरवसे भीमा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विश्व हिंदी दिवसानिमित्त विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक श्री पांचाळ देविदासराव व डॉ. विजय वडवराव यांचा विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर व श्री सुरवसे भीमा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके व्ही.बी. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts