पंढरपूर

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्याना शासनाकडून आणखी एक संधी – प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची माहिती

शनिवार दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार परीक्षा

स्वेरीचे सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची माहिती

पंढरपूर-
‘अचानक आलेला पाऊस त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, सोबतच कोरोना महामारी या व अन्य कारणामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्था खोळांबली होती. अशातच दि. ०१ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा संपन्न झाली परंतु या कालावधीत ही परीक्षा अनेक कारणांमुळे न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या परीक्षेच्या ‘अॅडीशनल सेशन’ साठी यशस्वीपणे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवार, दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी पीसीबी (बायोलॉजी) आणि दुपारी पीसीएम (मॅथ्स) अशा दोन सत्रात घेतली जाणार आहे.’ अशी माहिती गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

ज्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे एमएचटी-सीईटीची परीक्षा नियोजित वेळेत देता आली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा कक्षाने ‘अॅडीशनल सेशन’ ची संधी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ‘अॅडीशनल सेशन’ साठी शंभर रुपये ऑनलाईन भरून रजिस्ट्रेशन केले आहे, अशा विद्यार्थ्यांची येत्या शनिवारी, दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० पर्यंत पीसीबी (बायोलॉजी) तर दुपारी ०२.३० ते ०५.३० पर्यंत पीसीएम (मॅथ्स) ग्रूपची परीक्षा घेतली जाणार आहे. या ‘अॅडीशनल सेशन’साठी रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आपले अॅडमीट कार्ड मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर २०२० पासून डाऊनलोड करून शकतात. सदर अॅडमीट कार्ड वर परीक्षेचे केंद्र, रिपोर्टींग टाईम, दिवस आणि तारीख यांची सविस्तर माहिती दिलेली असेल. त्यासाठी विद्यार्थांनी स्टेट सीईटी सेलच्या संकेतस्थळाला (लिंक- https://mhtcet2020.mahaonline.gov.in.) भेट द्यावी. असे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे.

Related posts