उस्मानाबाद 

उस्मानाबाद तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून अधिका-यांची नियुक्ती

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी
सलमान मुल्ला
पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना मुदतवाढ न देता त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील मुदत संपणा-या 66 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यात मुदत संपणा-या ग्रामंपचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती केलेल्या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे :-
उस्मानाबाद तालुक्यातील बोरंगाव राजे, नितळी, चिखली ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी (शिक्षण) एन.टी. आदटराव, तर बोरखेडा, डकवाडी, घुगी ग्रा.पं. वर शाखा अभियंता एन.एस. पाटील, तर बुकनवाडी, राजुरी, रुई (ढोकी)/भंडाचीवाडी, टाकळी (ढोकी), तुगांव ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पंचायत) एस.ए. भांगे, कोळेवाडी, सुंभा, तावरजखेडा ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) पी.बी. वलसे, खामसवाडी, सकनेवाडी, नांदुर्गा (बरमगाव खु. वडाळा) ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) कि.द. वंजरवाडकर, तर बेगडा ग्रामपंचायतीवर आरोग्य पर्यवेक्षक आर.ए. हजारे, जहागिरदवाडी ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (शिक्षण) डी.आर. हाके, तर भानसगाव, आंबेवाडी, अनसुर्डा, बरमगांव बु ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) जे.व्ही. शिंदे, हिंगळजवाडी ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (शिक्षण) ए.एस. कांबळे, तर खामगाव, मुळेवाडी, गोवर्धनवाडी (थोडसरवाडी) ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) के.ए. जोशी, आरणी, मोहत्तरवाडी (पानवाडी), पवारवाडी, वाघोली ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (कृषी) आर.व्ही. बोईनवाड, तर पोहनेर, गावसूद ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) एस.के. बागल, भंडारवाडी व रामवाडी ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (कृषी) एच.आर. राठोड, जागजी ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (पंचायत) एस.ए. भांगे, लासोना ग्रामपंचायतीवर कृषी अधिकारी बी.आर. राऊत, सांजा ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (आरोग्य) आर.ए. हजारे, तर चिलवडी, गडदेवधरी, काजळा, कुमाळवाडी, सोनगांव, कारी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (पंचायत) एस.एस. कळसाईत, तर कारी, भिकार सारोळा, खेड ग्रा.पं. वर वि.अ. (शिक्षण) एस.यु. काळे, बावी का (कावलदारा तांडा), ताकविकी, वरवंटी ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (शिक्षण) सी.एन. चिलवंते, तर भंडारी (गोगाव काकसपूर), पळसप (घोगरेवाडी), पाटोदा, विठ्ठलवाडी (महादेवाडी), सांगवी, बेंबळी ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (पंचायत) बी.एच. देशमुख, तर घाटंग्री, कौडगाव (बावी), मेंडसिंगा, आळणी ग्रा.पं. वर कृषी अधिकारी एस.जे. दराडे, दारफळ, दाऊतपूर, धुत्ता ग्रा.पं. वर विस्ताराधिकारी (एनआरएलएम) एस.एम. चप्पलवार, तर गौडगावं, पिंपरी, वडगाव सिध्देश्वर ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (सांख्यिकी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts