महाराष्ट्र

बळीराजा करणार प्रांत कार्यालयातील बीएसएनएल’च्या टॉवर वर बसून उपोषण

सचिन झाडे पंढरपूर प्रतिनिधी 
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठचा गावांना महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त अनुदान जाहीर केले परंतु तलाठी सर्कल यांनी पंचनामा करताना दुजाभाव करून अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवलेले आहे.गाव पुढारी व त्यांचे बगलबच्चे यांनाच या अनुदानात लाभ मिळत असून सर्वसामान्य शेतकर्यांना मात्र अद्याप अनुदान मिळाले नाही.गेले अनेक दिवस याबाबत पाठपुरावा आंदोलने करीत आहे. तरीही प्रशासन जुमानत नाही. तरी शासनाने पंढरपूर तालुक्यातील पूरग्रस्तांना तातडीने अनुदान द्यावे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना प्रांत कार्यालयातील बीएसएनएल’च्या टॉवर वर बसून उपोषण करणार असल्याचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले.
पंढरपुर तालुक्याला सहा कोटी निधी आला असून तो अनेक गावातील शेतकऱ्यांना मिळाला आहे परंतु तालुक्यातील देगाव पटवर्धन कुरोली सांगवी तारापूर सुस्ते या गावातील बहुतांश शेतकरी वंचित राहिलेले आहेत आत्ता भीमा नदीला दुसऱ्यांदा पूर येण्याची शक्यता असून तरीही महसूल प्रशासन दखल घेत नाही शासनाने काही गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी पाठवलेला आहे परंतु काही बँका तो निधी जमा करून घेत नाहीत यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंढरपूरचे नायब तहसीलदार जमादार यांना निवेदन दिले.

विशेषता पटवर्धन कुरोली येथील सुमारे 230 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे व जाणून-बुजून सुमारे 76 शेतकरी वंचित राहिलेले आहेत या मागणी ची तातडीने दखल घ्यावी अन्यथा दि 21/ 9/ 2020 रोजी सकाळी अकरा वाजता पंढरपूर प्रांत कार्यालयातील उभ्या असलेल्या बीएसएनएल’च्या टावर वर चढून उपोषणास बसणार आहोत याची सर्व जबाबदारी महसूल प्रशासनाची राहील असे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले.
यावेळी बळीराजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर, बळीराजाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,महेश नाईक नवरे,अंकुश जवळेकर, मारुती कोळसे, विजय कोळसे ,समाधान उपासे, सुरज भांगे ,अनिल जवळेकर ,समाधान घाडगे,यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते

Related posts