महाराष्ट्र

भारत बायोटेकने 200 रुपयांनी स्वस्त केली कोव्हॅक्सिन लस

हैदराबाद : सीरम इंस्टिट्यूटने कोव्हिशिल्ड लसीच्या किंमतीत 100 रुपयांची कपात केल्यानंतर आता भारत बायोटेकने देखील आपल्या कोव्हॅक्सिन लसीच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे आता दोन्ही कोरोना लसी आणखी स्वस्त झाल्या आहेत. आपल्या कोरोना लसीची नवी किंमत नुकतीच भारत बायोटेकेने जारी केली आहे.


राज्य सरकारसाठी कोव्हॅक्सिनचा प्रति डोस 600 रुपये होता. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लसीचा दर हा 1200 रुपये ठेवण्यात आला होता. पण आता राज्य सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे. आता फक्त 400 रुपये प्रति डोस ही लस उपलब्ध होईल. म्हणजे जवळपास 200 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे.

Related posts