दक्षिण सोलापूर

मंद्रुपमध्ये कपड्याचे दुकान जळून खाक

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

मंद्रुप येथील मुख्य रस्त्यावरील पद्मावती होजिअरी हे कापड दुकानाला आगीत जळून खाक झाले. यात चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंद्रूप गावातील मुख्य रस्त्यावर बालाजी क्लिनिक शेजारी अप्पू शास्त्री यांचे पद्मावती होजिअरी दुकान आहे. धूप लावून शास्त्री हे दुकान बंद करून घरी गेले. रात्री आठच्या सुमारास दुकानाला आग लागली. दूर पाहून दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. परिसरातील अनेक तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी खाजगी टेम्पोतून पाणी आणून खिडकीतून मारले. पण आग जास्तच भडकत गेली..

या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे फौजदार गणेश पिंगूवाले, पोलीस शिपाई दिगंबर गेजगे, महांतेश मुळजे, कृष्णा पवार भरत चौधरी,घटनास्थळी आले. आग विजत नसल्याने सोलापूरच्या अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामक गाडीने पाण्याचा फवारा केल्यानंतर आग विझली.
या आगीमध्ये पद्मावती होजिअरी या कापड दुकानातील सर्व कापड फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. साधारण चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मंद्रूपच्या मुख्य रस्त्यावरील दुकानाला आग लागण्याची ही पहिलीच घटना घडली. मंद्रुप पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. अग्निशामक गाडी एक तासांनी पोहचली तो पर्यंत आतील कपडे व फर्निचर जाळून राख झाली होती..

Related posts