तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “भारतीय सेना दिवस” साजरा.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

उस्मानाबाद – तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे आज 15 जानेवारी म्हणजेच भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात आला.

आज 15 जानेवारी भारतीय आर्मी डे म्हणजेच भारतीय सेना दिवस. भारतीय सैनिकांचा मानसन्मान गौरव गाथा गाण्याचा दिवस. जे सैनिक आपल्या देशाच्या सीमेचे डोळ्यात तेल घालून संरक्षण करतात रक्षण करतात जे देशासाठी सर्वस्व त्याग करतात प्राण अर्पण करतात. आजपर्यंत असंख्य जवानांनी आपल्या भारतमातेच्या रक्षणार्थ आपले प्राण अर्पिले आहे. अशा सर्व शहीद जवानांना आज या सैन्य दिनाचे औचित्य साधून श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात मानवंदना देण्यात आली.

भारतीय सेना दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी विद्यालयातील मेजर श्रीमान कुलकर्णी सर व श्रीमान सोनकांबळे सर यांचा सत्कार विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमान घोडके व्ही. बी. यांच्या हस्ते करण्यात आला व भारतीय सेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयातील हिंदी शिक्षक श्री पांचाळ सर यांनी भारतीय सेना दिनाचे महत्त्व सेना स्थापना दिवस याबद्दल मार्गदर्शन केले

याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री सुरवसे सर श्री पडणुर सर श्री पांचाळ सर,श्री माने सर, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती तोडकरी मॅडम, श्रीमती मोरे मॅडम तसेच श्री हरिभाऊ कुलकर्णी सर, श्री ख़ूने सर श्री रणदिवे सर,श्री राजाभाऊ लोंढे,जलील हिपरगी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts