Blog

आधुनिक काळात युवका समोरील आव्हाने- – –

आधुनिक काळात युवका समोरील आव्हाने- – –

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

आजचा तरुण युवक म्हणजे देशाचा सर्वात मोठा शक्तिशाली विचाराने परिपक्व भविष्याचा वेध घेणारा भविष्यातील देशाचा कणा होय देशातील युवा वर्ग हा देशाचा एक शक्तिशाली दुवा आहे युवाशक्ती म्हणजे तरुण पिढी होय प्रत्यक्षात विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी तरुण युवक-युवतींचे खूप गरज व आवश्यकता आहे समाजातील ज्येष्ठ अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन व दिशा यांना मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे आजच्या युवकाला जर योग्य दिशा व सरळ जीवनातला रस्ता मिळाला किबस हे नवयुवक योग्य मार्गाने धावतील व यशापर्यंत पोहोचतील यशाच्या पाठीमागे धावत-पळत यश हे मिळत नसतं ते आपल्या कर्तृत्वावर िश्‍वासावर बळावर मिळवायचं असतं आजचे योग हे विज्ञान-तंत्रज्ञान प्रगत तसेच स्पर्धेचे युग आहे जर आपल्याला या स्पर्धेत टिकायचे असेल तर सतत अभ्यास नवीन ज्ञान नवीन तंत्रज्ञान विकसित उद्योग लघु उद्योग याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजच्या युवका समोर खूप मोठे मोठी आव्हाने समस्या पुढे येऊन थांबल्या आहेत सुशिक्षित बेकारी नोकरी न मिळणे मिळाली तर त्या नोकरीत समाधान नसणे आर्थिक विवंचना नोकरी न टिकणे तसेच देशातील लोकसंख्या विस्फोट हेच सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे प्रत्येक ठिकाणे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा व परीक्षा स्पर्धकांची अफाट संख्या परीक्षेतून निवड हजारोंच्या संख्येने अर्ज व शेवटी पदरी निराशा शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जीवनात प्रत्यक्षात उपयोगी पडत आहे का फक्त नोकरी पुरतेच शिक्षण आर्थिक विकासासाठी शिक्षण एवढे मर्यादित स्वरूप आहे का असा आज प्रश्न पडतो आहे व्यसनांचे वाढते प्रमाण हे शिक्षकांनी शिक्षणाला नोकरीला उद्योगाला खूप घातक आहे.

आजचा युवक या व्यसनामुळे दिशाहीन भरकटलेल्या अवस्थेत फिरताना दिसतो आहे व्यसनाच्या आधीन गेल्यामुळे तो आपला परिवार सुखी आनंदी ठेवू शकत नाही दारू पिणे नशापान करणे सिगारेट पान तंबाखू हे आपल्या शरीराला नष्ट करतात आरोग्य धनसंपदा आहे खूप मोलाचे आहे हे आजच्या युवकाने जाणायला हवे हळूहळू आजचा युवक हा एकलकोंडा होत चालला आहे संवाद हरवत चालला आहे बोलणे कमी झाले सतत मोबाईल गेम्स पिक्चर दिवस दिवस रात्र रात्र जागरण व त्याचा परिणाम म्हणून आरोग्याची समस्या पुढे येत आहे डोळ्याचे विकार पुढे येत आहेत मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे म्हणून पालकांनी संपूर्ण जबाबदारी सांभाळून मुलांकडे लक्ष देण्याची आज गरज आहे शिक्षणासाठी किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांसमोर आर्थिक संकट उभे राहते प्रत्येक ठिकाणी एवढी मोठी फेस डोनेशन कमी पगारावर नोकरी करणे घरापासून गावापासून खूप दूर च्या अंतरावर नोकरी करावी लागते ही फार मोठी समस्या व आव्हान आहे आपले घर परिवार आपली माणसे यांच्यापासून कुठेतरी दूर नोकरीच्या शोधात भटकावे लागते ही फार मोठी समस्या आधुनिक युवका समोर दिसून येते.

आजच्या नऊ युवकांनी काळाचा अभ्यास करून परिस्थितीचा अभ्यास आपला स्वतःचा कल स्वतःवर असलेला आत्मविश्वास स्वावलंबी पणा सकारात्मकतेने विचार पूर्वक आपले शिक्षण आपली नोकरी आपले क्षेत्र निवडले पाहिजे तरच त्या दिशेने अधिक प्रगती होते जो व्यक्ती चुकीच्या रस्त्याने धावण्यापेक्षा योग्य दिशेने मार्गाने कासवासारखे धावत राहिले तर नक्कीच यश मिळते भविष्यात युवकांसमोरील आव्हान आहे भ्रष्टाचार देशासमोरील समाजासमोरील तसेच प्रत्येक युवका समोरील सर्वात मोठे जटिल आव्हान म्हणजे भ्रष्टाचार होय आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला दिसून येतो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराची लागण झालेली दिसून येते की आज कोरोना च्या काळात आपण सर्वजण पहातच आहोत शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे सामान्य वर्गांनी गरिबांनी कुठून आणायचे पैसे भरमसाठ क्लासेसची फी कुठून भरायची की हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

अशा विविध समस्या आव्हानांच्या आव्हानांचा मुकाबला आजच्या नव युवकांना करावयाचा आहे अशाप्रकारे न व युवकांनी चुकीच्या मार्गाने न जाता विचारपूर्वक योग्य ध्येय ठरवून मेहनत करण्याची जिद्द तळमळ कार्याप्रती प्रेम ठेवून कामाला लागले तर जीवनात नक्कीच यशस्वी होतील व त्यांना यश मिळेल आधुनिक काळातील या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतः युवकांनी स्वावलंबी बनवून शिक्षणाचे अस्त्र शस्त्र सोबत घेऊन वाटचाल करावी युवकांनी एखादी क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास करावा त्यातील बारकावे पाहावे निरीक्षण करावे व योग्य तो निर्णय घ्यावा आज देश महाभयंकर अशा कोणाच्या महामारी तून जात आहे तर दुसरीकडे देशावर शत्रू कुरघोड्या करीत आहे शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारताच्या सीमेवर राजरोसपणे गोळीबार करीत आहे कित्येक नव सैनिक शहीद होत आहेत आपण सर्वांनी दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला पण त्या शूर वीर भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबियांची काय अवस्था असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही.

अशा विविध संकटे व समस्यांना आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्या युगातील नव्या पिढीतील न व तरुणांनी युवकांनी कंबर कसली पाहिजे एक सकारात्मक विचारांचा शक्तिशाली समूह तयार केला पाहिजे व देशाच्या संरक्षणासाठी तयार झाले पाहिजे दुसऱ्याच्या विचाराला बळी न पडता गुलाम न बनता स्वतःच्या विचारावर ठाम निर्णय क्षमता युवकांनी निर्माण केली पाहिजे कारण खरी कसोटी ही निर्णय क्षमतेवर अवलंबून असते ते वेळोवेळी आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे आजची वर्तमान अवस्था पावसाने वादळाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे शेतातील सर्व पिके वाहून गेली आहेत तेव्हा फक्त शिक्षणाचा हट्ट युवकांनी धरू नये तर विविध उद्योग क्षेत्रात आपली आवड निर्माण करून लघुउद्योग करता येतील व त्यातून आपले करिअर करता येते व आपल्या परिवाराला सुखी आनंदी करता येते आजच्या या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी युवकांनी कुठल्याही कामाची लाज कमीपणा न बाळगता काम करून आपले नाव कमावले पाहिजे व आपल्या कुटुंबाचा एक जबाबदार घटक मी आणि माझे कुटुंब बनून जबाबदारी पार पाडली पाहिजे।

धन्यवाद…!

Related posts