उस्मानाबाद 

मुद्रांक पेपर ऐवजी नागरीकांनी ई-एसबीटीआरचा वापर करावा

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद – सद्यस्थितीत बँकामार्फत मोठ्या प्रमाणात पीक कर्ज तसेच कृषी कर्जाचे वाटप करण्यात येत आहे.त्यासाठी व तसेच इतर अन्य कामासाठी शंभर रुपयाच्या मुद्रांकाची आवश्यकता असते. मुद्रांक शुल्कासाठी मुद्रांक पेपर व्यतिरिक्त इतर पर्याय म्हणून ई-एसबीटीआर आहे. त्याचा वापर मुद्रांक पेपर ऐवजी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जनतेने बँकेकडून आवश्यक त्या रकमेचे मुद्रांक, ई-एसबीटीआर प्राप्त करावेत, म्हणजे कसल्याही प्रकारचा मुद्रांक तुटवडा भासणार नाही.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या उस्मानाबाद, कळंब, ईट ता. भूम, तुळजापूर, उस्मानाबाद (आनंदनगर), उमरगा शाखेमध्ये, बँक ऑफ इंडियाच्या उस्मानाबाद, उमरगा, भूम, परंडा, कळंब शाखेत, युनियन बँक ऑफ इंडियाच्या उस्मानाबाद शाखेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उस्मानाबाद, परंडा, तुळजापर, कळंब, भूम, उमरगा शाखेमध्ये ई-एसबीटीआर ही सुविधा उपलब्ध असून जनतेने तेथून ई-एसबीटीआर प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन ध.ज.माईनकर मुद्रांक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

Related posts