पंढरपूर

येत्या दि.७ जाने. पासून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात

तीन दिवस चालणार प्रक्रिया

सचिन झाडे –
पंढरपूरः-

‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी येत्या गुरुवार, दि.७ जानेवारी २०२१ पासून तर पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक.प्रवेशासाठी येत्या बुधवार, दि. ०६ जानेवारी २०२१ पासून ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात होत असून यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक महाविद्यालयांची नावे भरायची असतात. यासाठी संबंधित महाविद्यालयातील प्लेसमेंट, वार्षिक परीक्षेचा निकाल, प्रत्येक वर्षीचे प्रवेश, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, सोयी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर या बाबी प्रामुख्याने आवर्जून पहाव्यात मगच महाविद्यालय निवडावे. त्याचबरोबर आपला पासवर्ड कोणालाही देवू नये.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून आता कॅप राऊंड सुरु होतील.
यासाठी महाराष्ट्र राज्य केंद्रीय प्रवेश प्रक्रिया विभागाने कॅप राऊंडच्या तारखा निश्चित केल्या असून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.) व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड-१) येत्या गुरुवार, दि.०७ जानेवारी २०२१ पासून ते शनिवार, दि. ०९ जानेवारी २०२१ पर्यंत, तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्या एम.ई./ एम.टेक.च्या प्रवेशासाठी बुधवार, दि.०६ जानेवारी २०२१ पासून ते शुक्रवार, दि. ८ जानेवारी २०२१ पर्यंत प्रक्रिया चालतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश होता त्यानंतर आताच्या टप्प्यात कॉलेज निवडीसाठी ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत. स्वेरी महाविद्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माढा, कुर्डुवाडी, करकंब या ठिकाणी मोफत ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

तसेच स्वेरी अभियांत्रिकीचा इन्स्टिट्यूट चॉईस कोड EN-६२२० हा आहे याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मोहोळ (डी.टी.काशीद- ९१६८६५५३३५, एन.एस. शेख-९७६४७९३१८६), मंगळवेढा (पी. बी. आसबे -७८२१००४६४७, आर.डी.सोळगे-९७६६९९०२७४), सांगोला (के.बी.जुंधळे-९३७०३४४९८०, एस.डी.कदम-८९९०३७३५५), करकंब (एन.एस.आदमिले-९३२३५९०१६०, एस.डी.भिंगारे-९८९०२३६७०९), कुर्डुवाडी (एच.एम. तांबोळी -८३८००९०२६०, एस.सी. हलकुडे -९८५०२४२१५५) आणि माढा (ए.के. पारखे-९५०३६३२६२२, आर.एस. साठे-७७०९९४१४८२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०), प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related posts