सोलापूर शहर

फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती संदेश 

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा गणेशोत्सवनिमित्त उपक्रम

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व बनशंकरी गणेशोत्सव मंडळच्या च्यावतीने गणेशोत्सवनिमित्त आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती संदेश तसेच सामाजिक संदेश दिला.
जागृक होण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद, इन्कलाब जिंदाबादची घोषणा देणारे भगतसिंग, मुलींना शिक्षणाचा संदेश देणार्‍या सावित्रीबाई फुले, स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे छत्रपती शिवराय तर  धार्मिक एकतेची शिकवण देणारे साईबाबा अशा विविध रूपात बाळगोपाळांनी बनशंकरी नगर येथील श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व बनशंकरी गणेशोत्सव मंडळच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सामाजिक संदेश दिला. डाँक्टर, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, राधा-कुष्णा, आशा कोरोना संदर्भात याद्वारे संदेश दिला.
गणेशोत्सवानिमित्त सळई मारूती मंदिर येथील श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व बनशंकरी गणेशोत्सव मंडळच्या वतीने स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी 120 विद्यार्थी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून, साकारलेल्या विविध कपड्यातुन आपल्या गुण कौशल्याची चुणूक दाखविली. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात दाद दिली.
विजेत्या स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून करिअर कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचे प्रमुख विश्र्वजीत म्हमाणे, परशुराम मोबाईल शाँपीचे रवी नावदगीकर, साईनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कारंडे, बनशंकरी गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष स्वप्निल जवळकोटे, संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. आदींसह पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षण छत्रपती शिवाजी संकुलचे शिक्षक तेजस्विनी मुळेपवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले. तर आभार मयुर गवते मानले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत मिसाळ, अभिजीत होनकळस, शामकुमार मुळे, गणेश माने, गणेश बुलबुले, बसवराज यलशेट्टी आदीनी परिश्रम घेतले.\

हे आहेत बक्षिसाचे मानकरी

प्रथम क्रमांक-  कृतिका वजमाने, द्वितीय क्रमांक- सोहम येमुल, तृतीय क्रमांक स्वरा बिज्जरर्गी, उत्तेजनार्थ- श्रावणी महिंद्रकर, अदिती चोळ्ळे, रिध्दी शिंदे, इशान कदम, नित्यश्री अंकाम हे बक्षिसाचे मानकरी ठरले.

Related posts