सोलापूर शहर

सोलापूरच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट 

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळाने गणेश उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करावा असा आवाहन सोलापूर शहरातील उत्सव मंडळ आणि कार्यकर्त्यांना केला आहे. कुणीही मंडप घालून गणेश उत्सव करू नये. आपल्या नजीकच्या मंदिरात गणेशाच्या छोट्या मूर्तीची किंवा प्रतिमेची प्रतिष्ठापना करावी. तिथेच नियमित पूजा करावी .गर्दी टाळावी रोषणाई आणी देखावे करू नयेत . यासाठी वर्गणी देणगी ही गोळा करू नये अस आवाहन करण्यात आला आहे .मध्यवर्ती च्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं अध्यक्ष नरसिंग मेंगजी यांनी सांगितलं .यावेळी सुनील रसाळे, संजय शिंदे ,विजय पुकाळे आदी उपस्थित होते.


अनेक शहरातील मोठ्या मंडळांनी यापूर्वीच उत्सव अत्यंत साधेपणानं आणि मिरवणुका न काढण्याचा निर्णय घेतला आहे असंही नरसिंग मेंगजी यांनी स्पष्ट केलं यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने संपूर्ण जगासोबत भारत देशाला ही ग्रासले आहे़ गेल्या तीन चार महिन्यांपासून संपूर्ण जनतेला या संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा शनिवार २२ आॅगस्ट गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरले़ ज्या मंडळाच्या गणपती मुर्ती मंदिरात आहेत त्यांनी तेथेच दहा दिवसांचा उत्सव साजरा करावा, इतर मंडळांनी ही रस्त्यांवर मंडप न मारता खासगी जागेत साधेपणाने छोट्या मुर्ती आणून किंवा गणेश प्रतिमा ठेवून उत्सव साजरा करावा असे आवाहन सार्वजनिक महामंडळाच्या पदाधिकाºयांनी केले आहे़ यंदाच्या वर्षी कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची वर्गणी, देणगी न घेता जनतेला व प्रशासनाला सहकार्य करावे असेही बैठकीत ठरल्याचेही माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी सांगितले़ या पत्रकार परिषदेला सुनील रसाळे, विजय पुकाळे, संजय शिंदे उपस्थित होते.

Related posts