कविता 

दिवस ते बालपणीचे- – –

दिवस ते बालपणीचे
निस्वार्थ निस्पृह मनी खेळण्या-बागडण्याचे
स्वानन्दी हुंदडण्याचे

कधी झिम्मा कधी
फुगडी कधी क्यारम
कधी झोका कधी
गोटया तर कधी
विटीदांडू खेळण्याचे

दिवस ते सुट्टीचे
खाण्यापिण्याचे
हिंडन्या फिरण्याचे
मित्र-मैत्रिणी भांडण
कट्टी फू करण्याचे
फुलपाखरासारखे
भिर भिर न्याचे।

दिवस ते बालपणीचे
आई-बाबांना बीलग्नयाचे
प्रेम जिव्हाळा आनंद
मिळविण्याचे ।

दिवस ते आत्मीयतेचे
दिवस शाळेतील आठवणीचे
खापरी पाटि पेन्सिल
आण मणी मोजण्याचे
नवीन नवीन पुस्तके
त्यांच्यातील सुंदर चित्रे
बघण्याचे व पाना
पाना तील सुगंधाचे

दिवस ते सणासुदीचे
सर्वांनी एकत्र जमायचे
गोड-धोड खायचे
कपडे लते घ्यायचे
आनंदी आनंद मानायचे
दिवस ते बालपणीचे ….

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts