Blog

6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन- – – – –

आज सहा डिसेंबर, भारतरत्न, महामानव, दिन दलितांचे कैवारी, भारताचे संविधान करते, एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ ,डॉक्टर, वकील, राजकीय तत्त्ववेत्ते, राजकीय विश्लेषक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. सर्वप्रथम आजच्या या दिनी या महान मानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन. डॉक्टर आंबेडकर आणि शिक्षण यांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध त्यांच्या मौलिक विचारावर टाकलेला एक छोटासा प्रकाश. शिक्षणाने माणूस मोठा होतो, विद्वान होतो, सुसंस्कारित होतो, म्हणून सर्वांनी सर्वप्रथम शिक्षण घेतले पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यांचे शैक्षणिक विचार, राजकीय विचार सामाजिक विचार तसेच त्यांचे पुस्तकावरील प्रेम त्यांचे वाचन वेड त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास, माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे शिक्षणाबद्दल ते म्हणतात की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी ते पिइल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” इतकी ताकत शक्ती या शिक्षणामध्ये आहे.

शिक्षणाने सर्व भेदाभेद दूर होतात. एकतेचा विचार, सर्वधर्म समानतेचा विचार आपल्या समोर येतात. आपल्या मनात समाजाप्रती देशाप्रती प्रेम व जिव्हाळा निर्माण होतो. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाला खूप खूप महत्त्व दिले आहे. त्या काळात त्यांच्या समोर येणाऱ्या सर्व बाजूने येणाऱ्या संकटांना कशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या कुटुंबीयाने त्याचा सामना करून आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले, सामाजिक कार्य सक्रियतेने केले हे आपणा सर्वांना माहितीच आहे. त्याकाळची सामाजिक परिस्थिती ही भेदाभेदाचि होती. शूद्र, अतिशूद्र म्हणून समाजाने वंचित केले असताना भेदाभेद, वर्णभेद, जातिभेद, भाषाभेद, विविध धर्म संप्रदाय यांचा पगडा शिक्षणापासून दूर ठेवणे, शाळेत, गावात, शहरात समाजापासून दूर ठेवणे, वेळप्रसंगी मारहाण करणे, जाचक व जुलमी अटीतटी त्यांना सामोरे जात दुःख अपमान यातना सहन करीत डॉक्टर आंबेडकरांचे बालपण गेले.

आपला समाज हा अज्ञानी आहे अडाणी आहे. आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. आपल्या देशात महिलांना स्त्रियांना उपेक्षितांचे जिने आहे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत. त्यांना फक्त चूल आणि मूल एवढाच अधिकार दिला होता व बाकी सर्व कार्य जबाबदाऱ्या पुरुषांकडे होत्या. त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी हे सर्व अनुभवले होते. याच अनुभवावरून त्यांना असे लक्षात आले की, सर्व प्रथम आपल्या समाजातील तळागाळातील अडाणी, अज्ञानी, महिला व पुरुष यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. सर्वप्रथम त्यांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे तेव्हा त्यांची सोय व्यवस्था केली पाहिजे, शिक्षण हे अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यावर चालणारे एक शस्त्र आहे, शिक्षण हे एकअस्त्र आहे. देशाचा समाजाचा विकास साध्य करायचा असेल तर सर्वांना समान शिक्षण समान न्याय समान कायदे कानून असले पाहिजेत हे त्यांनी समाजाला जागृत करून सांगितले. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय त्याला कळत नाही हा देश घामाच्या पैशावर चालतो की आपण गुलाम आहोत, पारतंत्र्यात आहोत कोणाच्यातरी जोखडाखाली काम करत आहोत यासाठी स्वावलंबी विचार स्वावलंबी कार्य स्वतःच्या पायावर उभे राहणे हे शिक्षण शिकवते. म्हणून त्यांनी त्या काळात शिक्षणाचा खूप प्रचार-प्रसार केला

त्याचबरोबर त्यांचे वाचन वेड हे खूप मोठ्या प्रमाणात होते त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी आपल्या छोट्या घरी एक छोटसं ग्रंथालय तयार केले होते या ग्रंथालया मधील वेगवेगळ्या तत्त्वज्ञान चे विचार कांची की राजकीय विश्लेषकांचे ची पुस्तके त्यांच्या वाचनात आली त्यामुळे कायद्याचा अभ्यास राजकीय क्षेत्राचा अभ्यास त्यांचा भक्कम झाला जवळ जवळ अठरा-अठरा तास त्यांचे वाचन चालत असे हाच वाचनाचा उपक्रम त्यांचे पुस्तकावरील प्रेम आपल्या नव युवकांना व विद्यार्थ्यांना प्रेरित करते समान हक्क समान न्याय सर्वधर्मसमभाव यासाठीच त्यांनी मौलिक अशा संविधानाची निर्मिती केली व जगाला एक आदर्श लोकशाही समोर आली भारत हा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे आणि या देशात गरीब दिन मजूर वर्ग या सर्वांना समान हक्क व समान न्याय मिळाला पाहिजे सर्वांना रोजगार स्वयं रोजगार नोकरी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी आरक्षणाची निर्मिती केली व सर्वात मोठे कार्य केले अशा या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन आजच्या नऊ युवकाने नऊ तरुणांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास केला तर त्यांची जास्तीत जास्त प्रगती होईल विकास होईल यादृष्टीने समाजाचा विकास होईल हे निश्चितच आहे.

आज त्यांच्या विचारांची त्यांच्या सचोटीची त्यांच्या अभ्यासाची खरी गरज आहे त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जर कार्याला लागले तर आजच्या या दिवसाचं खर महत्त्व व सार्थक होईल पुनश्च एकदा या महामानवास विनम्र अभिवादन…!

धन्यवाद…!

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर.

Related posts