उस्मानाबाद 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद करिता अधिगृहीत केलेल्या भुखंडाला एम.आय.डी.सी. आकारत असलेले शुल्क हे शैक्षणिक क्षेत्र निकषाखाली रद्द करण्याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर यांचे खा. सुप्रियाताई सुळे याना निवेदन.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर / उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद करिता अधिगृहीत केलेल्या भुखंडाला एम.आय.डी.सी. आकारत असलेले शुल्क हे शैक्षणिक क्षेत्र निकषाखाली रद्द करण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. संजय निंबाळकर यांनी खा. सुप्रिया सुळे यांना दिले.


विद्यापीठ उपपरिसर च्या विविध विषयांवर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. मा. सुप्रियाताई सुळे व व्यवस्थापन परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. संजय निंबाळकर.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. संजय निंबाळकर यांनी काल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद च्या संदर्भात भेट घेतली. यामध्ये विविध विषयांवर त्यांनी सविस्तरपणे चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद करिता अधिगृहीत केलेल्या भुखंडाला एम.आय.डी.सी. आकारत असलेले शुल्क हे शैक्षणिक क्षेत्र निकषाखाली रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करत हे शुल्क रद्द करण्याची मागणी खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली. यासह विद्यापीठाच्या अनेक विषयांवर चर्चा केल्यानंतर विद्यापीठाच्या सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन यावेळी मा. खा. सुप्रियाताई सुळे यांनी मा. संजय निंबाळकर यांना दिले.

यानंतर मा.श्री.बी वेणुगोपाल रेड्डी, प्रधान सचिव, उदयोग,उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांचाशी सुद्धा व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर यांची सकारात्म चर्चा झाली. तसेच उपकेंद्राला आवश्यक असणाऱ्या इतर सोई पण उपलब्ध करून देण्याबाबत त्यानी यावेळी आश्वासन दिले.

लवकरात लवकर विद्यापीठ उपपपरिसर हा शैक्षणिक क्षेत्र म्हणून घोषित होऊन उपकेंद्रात भरावे लागणारे शुल्क माफ होऊन त्याचा विद्यापीठ उप परिसरास फायदा होईल असे यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर यांनी सांगितले.

Related posts