कविता 

दारुडया

———///—–
बाबा नका हो पिऊ दारू
तुम्हा किती हो विनवनी करू
मला लहानाची थोर केली
पण दारू नाही सुटली
आईची माया तोड़ली
तरी तुम्हाला दया नाही आली
बाबा नाका हो पिऊ दारू!
गाई म्हशीचाकेला बाजार
आता कुणी नाही उरला शेजार

दारुच्या नशात तुम्हा
आई नाही हो दिसली
रातच्या तुम्ही तिला दगडानी
ठेचली!
बाबा नका हो पिऊ दारू
या दारुच्या पायी
घर झाल हो उध्वस्त
भिकला लागली सारी
शेतावर काढूनिया कर्ज
तुमच्या या दारू पायी
बाबा नका पिऊ हो दारू
आज तरी सोडा हो दारुला
मि निघाले सासरला
सारा गांव म्हणील
“दारुडया” दारुडया” तुम्हाला

================================================================================================

कवि:-
श्री देवीदास पांचाळ सर
सैनिक स्कूल तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts