बार्शी

सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये खा. ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रकारच्या केल्या मागण्या.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

जिल्हा नियोजन सभागृह, सोलापूर येथे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.दत्तात्रय (मामा) भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस उपस्थित राहून खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून बार्शी विधानसभा मतदारसंघातील विविध विषय मांडण्यात आले.

यामध्ये पीक कर्जाचे टार्गेट प्रमाणे वाटप न केलेल्या बँक मॅनेजर वर गुन्हा दाखल करण्यात यावेत. बार्शी येथिल भगवंत देवस्थान चा “ब” वर्गात समावेश करण्याबाबत चा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा. असा ठराव खा. ओमराजे निंबाळकर यांनी मांडला व जिल्हा नियोजन समितीमध्ये तो मंजुर करण्यात आला.

जुलै- ऑक्टोबर 2020 महिन्यात बार्शी तालुक्यातील अतिवृष्टी मुळे वाहून गेलेले पूल, तलाव, बंधारे तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत निधी उपलब्ध करण्यात यावा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MREGS) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये दोन कामे त्यामधील ग्रामपंचायतने एक रस्ता व एक रस्ता यंत्रणेवरती करण्याच्या यापूर्वी सूचना केल्या होत्या. परंतु सदर सूचना अंमलात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन कामे रस्त्याची चालू करावीत. असे निर्देश दिले.

यावेळी राज्यमंत्री तथा सोलापूर चे पालकमंत्री मा. श्री. दत्ता (मामा) भरणे, धारशिव लोकसभेचे खा. ओमराजे निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, बार्शीचे आ.राजेंद्र राऊत, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ.बबनदादा शिंदे, आ.संजय मामा शिंदे, आ.प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.श‍िवशंकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर तसेच सर्व सन्मानित सदस्य उपस्थित होते.

Related posts