उस्मानाबाद 

खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते पाटोदा येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्तचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतूत्वावर विश्वास ठेवून पाटोदा ता. धाराशिव(उस्मानाबाद) येथिल माजी सरपंच महादेव नाना ढोणे, माजी सरपंच कल्याण लोदगे, चेअरमन चंद्रकांत टाकमोघे, प्रभाकर राजगुरु, मनोहर ढोले, विक्रम साठे, राहुल ढोले, समाधान ढोले, दत्तू बोंडगे, अमोल निलंगे, हनुमंत माळी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी खा. ओमराजे निंबाळकर उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले की, शिवसेना हा एक परिवार आहे. आम्ही पक्ष वाढवत असताना घराणे शाहीचे राजकारण करत नाहीत व केले नाही. या परिवरातून सर्व सामान्य कार्यकर्त्यास लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळते. याचे उदाहरण म्हणजे सर्व सामान्य कुटुंबातील कैलास घाडगे-पाटील सांज गटातून जि.प.सदस्य, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार झाले. सर्व सामान्य कार्यकर्त्यांला पक्षात न्याय मिळतो. आपण देखिल सर्व सामान्य माणसाची कामे करा. आपल्याला हि भविष्यात पक्षाच्या माध्यमातून अनेक पदे स्व:कर्तुत्वाने मिळतील.

आपल्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक चांगल्या प्रकारे आले. पिक भिजवण्याचे प्रमाण वाढल्याने विजेचा वापर वाढला असून या वाढत्या विजेच्या वापरामुळे ट्रान्सफॉर्मर व सबटेशनवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे अशा ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या तसेच कमी दाबाने चलणे असे प्रकार घडत आहेत. मात्र असे नविन ट्रान्सफॉर्मर बनवीत असताना डिमांड अभावी कनेक्शन असल्याने लोड दिसुन येत नाही त्यामुळे नविन ट्रान्सफॉर्मरचे अंदाज पत्रक करता येत नाही. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहेत त्यांनी आपले नविन डिमांड भरून कनेक्शन घेण्यात यावे. त्यामुळे आपणांस नविन अधिक ट्रान्सफॉर्मर, सबटेशन बनवता येतील. तसेच गावची विविध विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असा यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित जनतेला शब्द दिला.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आल्या पासून राज्यात शेतकरी, गोरगरिब, सर्व सामान्य नागरिकांची कामे सरकार करत आहेत. याचाच उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्यात 1992 मध्येच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले. परंतु इथल्या राजकीयांनी ते दुसरीकडेच पळविले गेले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना अल्प खर्चात उपचार घेता येणार आहेत. तसेच गोरगरिबांची मुले या विद्यालय मेडिकलच्या शिक्षण घेऊ शकणार आहेत.

तसेच दोन दिवसापूर्वीच मराठवाड्यासह धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास चालना देण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गतच्या प्राध्यानक्रमाची मर्यादा वाढवून कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावापर्यंतची कामे यामध्ये समाविष्ट करण्याचा महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. येत्या 2023 पर्यंत 7 टी एम सी.पाणी दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावात येणार आहे ते आपणांस पहावयास मिळेल. अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. अशी कामे सरकारच्या योजना सर्व सामान्य नागरिकांन पर्यंत पोहचवून लोकांना न्याय देण्याचे काम करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी धारशिवचे लोकप्रिय खा. ओमराजे निंबाळकर शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, विभागप्रमुख दत्ता परीट, ग्रा.पं. सदस्य अमीर शेख, प्रविण कोकाटे, भिमा (आण्णा) जाधव, अल्लानुर भाई, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, तुळजापूर युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, ऋषी कोळगे, यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts