Blog

शिक्षण व महिला सबलीकरण ; 8 मार्च – जागतिक महिला दिन एक दॄष्टिक्षेप—–

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

=====================================================================================================

आज आठ मार्च जागतिक महिला दिन, महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला विशेष लेख महिला दिवस म्हणजे महिलांचा गौरव करणे , महिला शक्तीचा आदर करण्याचा व उत्स्फूर्तपणे उत्साह वाढवण्याचा जागतिक महिला दिन, महिला दिनाच्या,सर्व महिला भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भारतातील प्राचीन व आधुनिक काळातील करतबगार महिलाच्या अमूल्य कार्याचा घेतलेला एक छोटासा आढावा.

आपल्या भारतात विविध , क्षेत्रात,कला क्रीडा, विज्ञान संशोधन, नेव्ही अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर कार्य करणाऱ्या, नेत्रदीपक व उज्वल कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार गौरव केला जातो त्यांच्या नावाचा उल्लेख करणे म्हणजेच त्यांचा गौरव करणे होय. प्राचीन काळापासून रजिया सुलताना, चांद बीबी,राष्ट्रमाता- राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, होळकर, राणीसईबाई ,सोयराबाई, तारारानी ,अशा अनेक शूर वीर महिलांनी देशासाठी, स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करून महिला शक्ती चे उदाहरण आपल्यासमोर ठेवलेले आहे! जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? थोडक्यात जाणून घेऊया प्राचीन काळात जगभरातील महिलांना अमेरिका आणि युरोप सहित मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता स्त्री-पुरुष विषमता मोठ्या प्रमाणावर होती ,अमेरिकन कामगार स्त्रिया ला लिंग, वर्ण भेद ,तसेच शैक्षणिक चळवळ यापासून दूर ठेवण्यात आले होते हजारो अमेरिकन कामगार स्त्रिया एकत्र येऊन एक मोठी चळवळ उभी राहिली या पार्श्वभूमीवर सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी करण्यात आली व ती आठ मार्च 1909 रोजी मान्य करण्यात आली म्हणून अमेरिका तसेच सर्वत्र जगभर या विचाराला मान्यता मिळाली व 8 मार्च रोजी न्यूयार्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता म्हणून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो ,

आपल्या भारतात ही महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे केले जातात व कला क्रीडा, विज्ञान, संशोधन, नेव्ही, अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर कार्य करणाऱ्या, नेत्रदीपक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार गौरव केला जातो आपल्याला माहिती आहे की महिला किंवा स्त्री म्हटलं की प्रेम, वात्सल्य, ममता, स्नेह ,संस्कार मूल्य ,अशी प्रतिमा किंवा भावना आपल्या मनात येते पण त्याच बरोबर मनाचा कणखरपणा ,शूरता वीरता, धाडसी पणा दाखऊन दिला आहे भारत हा शूरवीरांचा देश आहे ,संतांची भूमी आहे तसेच ती शुर व धाडसी विचारांची खान आहे सर्वप्रथम आठवतो तो स्वातंत्र्याचा महासंग्राम अठराशे सत्तावन चा स्वातंत्र्यलढा! व या लढ्यात लढलेली रणरागिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई! मेरी झांसी नही दुंगी अशी गर्जना करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी राणी लक्ष्मीबाई म्हणजेच मंनकर्णिका। स्वातंत्रयासाठी इंगरजाना विरोध करुंन लढणारी मर्दानि होती “ढाल छातिशी,पुत्र पाठीशी हातामधे तलवार, मी स्वातंत्रयासाठी लढणार! तसेच शून्यातून महाराष्ट्राची निर्मिती करणारे, इस्लामी, सुलतानी संकटाचा सामना करून हिन्दवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी महान माता राजमाता जिजाऊ होती !

भारतीय समाज रचना ही मूलतः स्त्री शक्तीवर आधारलेली आहे परंतु प्राचीन काळापासून समाजावर पुरुषांचे वर्चस्व दिसून येते जगात पुरुष प्रधान संस्कृती म्हणून पुढे येते प्रत्येक यशस्वी तसेच अयशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीची प्रेरणा किंवा शक्ती असते असे म्हणतात त्या शक्तीच्या बळावरच पुरुष एक तर मोठा बनतो किंवा छोटा बनतो म्हणून समाजाच्या रचनेचा मूळ आधार ही स्त्री आहे प्राचीन समाजाचा विचार केला तर या समाजाने स्त्रीचे खूप हाल केलेले दिसून येतात छळ केलेला आहे स्त्रीचे विविध कारणाने भयंकर दुर्दशा झालेली दिसून येते. पूर्वी स्त्री ही अंधश्रद्धेवर आधारलेली दुबळी शक्तिहीन अपराजिता आपला विश्वास हीन व उपभोगाची वस्तू होती आचल मे दूध और आखो मे पानी यह ही अबला नारी तेरे जीवन की कहानी अगदी असंच स्वरूप महिलांचा होतं महिला या अज्ञानी होत्या नव्हे त्यांना अज्ञानात ठेवण्यात आले होते म्हणतात ना अज्ञाना जवळ आत्मविश्वास नसतो शिक्षण आणि महिला असे समीकरण शिक्षण सम्राट महात्मा फुले व शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली मांडले!

एकंदरीत समाजाचा बारकाईने अभ्यास केला समाजाचे स्त्रियांकडे दुर्लक्ष होते महिलांची प्रगती महिलांचे प्रश्न महिला स्वातंत्र्य शिक्षण व महिला एकत्रीकरण याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नव्हते समाज डोळे असून आंधळा, कान असून बहिरा, व तोंड असून मुका झाला होता. मती भ्रष्ट झाली होती म्हणून ते म्हणत विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने घडले देशाच्या पाठीचा मुळ कणा, विकासाचा मूळ कणा म्हणजे स्त्री शिक्षण होय आजची स्त्री ही शिकली पाहिजे शाळेत गेली पाहिजे व पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळविले पाहिजे स्त्री सुसंस्कृत बनली पाहिजे तरच सर्व घर सुसंस्कृत बनेल ,बालकाचा पहिला गुरु ही आई असते भक्ती, भाव, संस्कार, हे आईचेच असतात एका सुसंस्कृत आपल्याआईमुळेच हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज घडले,आईमुळेच मातृहृदयी साने गुरुजी घडले, आईमुळेच डॉ बाबासाहेब अंबेडकर घडले हे वास्तव आपल्या समोर आहे. आधुनिक शिक्षणाचा मुख्य उद्देश स्त्री-स्वातंत्र्य असला पाहिजे स्त्रीसुद्धा जन्मताच स्वतंत्र आहे तिला बोलण्याचा राहण्याचा लिहिण्याचा समाजात जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हा अधिकार राखून ठेवत शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचा खरा अर्थ स्पष्ट करून दिला यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पटवून दिले!

महिलांचे शिक्षण हे मूल्यावर आधारित असले पाहिजे मूल्यशिक्षण हा भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे स्त्रीशक्तीची एकता ,एकसंघता निर्माण करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे शिक्षणाणे महिला सबल ,शक्तिशाली बनतात स्वावलंबी बनतात एकत्र आल्याने वाद संवादातील चातुर्य पणा वाढतो व भाषण कौशल्य येते त्यांच्या विचारांचे एकत्रीकरण होऊन कुठे तरी त्यांना कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते याचे उदाहरण म्हणजे आज महिलांच्या शाळा आरोग्य वाहतूक खेळ संस्कृतीक विमानसेवा सैनिक आदी क्षेत्रात कार्य करताना दिसून येते खरं तर स्त्री ही आपल्या घरची मंत्री आहे घर सांभाळते गृहमंत्री, मुलाचे शिक्षण पाहते शिक्षण मंत्री, मुलांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणजे आरोग्य मंत्री, बाजार व्यवहार हिशोब ठेवते म्हणजे अर्थमंत्री, घरच्या सर्व कुटुंबाची खानपान बघते अन्न व पुरवठा मंत्री, या सर्वाहून अत्यंत महत्त्वाचे मुलांचे शिक्षण घेते म्हणजेच शिक्षणमंत्री!

सर्वांची काळजी घेते काळजीवाहू मंत्री, पण हे सगळे कर्तव्य पार पाडत असताना ती स्वतःला मात्र पूर्णपणे विसरून जाते पूर्णपणे स्वतःकडे दुर्लक्ष करते परंतु शिक्षणाने तिला या संपूर्ण गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे व इतका बरोबरच स्वतःची काळजी घेण्यास भाग पाडले पाहिजे तरच शिक्षणाने महिलांचे सबलीकरण होऊ शकते शिक्षण हे अस्त्र आहे, शिक्षण हे शास्त्र आहे, याचा उपयोग नीट पणे झाला पाहिजे महिला शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे व स्त्रियांना दर्जेदार ,आनंददायी मनोरंजनातून मूल्याधिष्ठित व्यवहार कुशल शिक्षण दिले पाहिजे शिक्षण हा महिला प्रगतीचा मूलमंत्र आहे व तो समाजाच्या तळागाळातील महिलांना मिळालाच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे हक्क आहे तरच महिलांचे सबलीकरण होईल समाज सुसंस्कृत बनेल प्रगतिशील बनेल यात शंका नाही आई माझा गुरु आई कल्पतरु सौख्याचा सागरू आई माझी मुलांचा पहिला गुरु ही आई असते मुलावर संस्कार चांगले झाले पाहिजेत आपला देश आपली संस्कृती आपली प्रार्थना आपली घरे आपली माणसे नाते-गोते या संदर्भातील संपूर्ण माहिती एकत्रित मुलांना देऊ शकते मुळात आपले घर म्हणजेच मुलांचे संस्कार केंद्र आहे तेव्हा हे संस्कार केंद्र चांगले असले पाहिजेत वडिलांपेक्षा आई श्रेष्ठ असते आईमुळेच महान महात्मे तयार होतात शिक्षणामुळे महिलांच्या समस्या ह्या सुटतील , शिक्षणाने देशातील दारिद्र्य निर्मूलन होऊशकेल.

प्राचीन काळातील विधवाविवाह, बालविवाह, केशवपन, सती प्रथा, स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलन झालेले आहे अशा प्रकारे शिक्षणाने अबला महिला सबला बनली आहे शिक्षणाने पुरुष स्त्री असा भेदभाव राहिला नाही स्त्री पुरुष समानता निर्माण झाली पूर्वीची चूल आणि मूल पद्धत न राहता ती चुलीपासून दूर जाऊन आज विज्ञान तंत्रज्ञान संशोधक सैनिक अशा विविध आघाड्यांवर कार्यरत आहे शिक्षण आणि महिला सबलीकरण हे सूत्र अगदी बरोबर आहे शिक्षण आणि महिला मध्ये दृढ विश्वास स्वावलंबन आत्मनिर्भरता, आत्मसन्मान वाढीस लागतो आणि त्या पुरुषाच्या बरोबरीने कार्य करण्यास समाजात उतरतात आधुनिक काळात महिलांचे संघटन शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात दिसून येते महिला बचत गट ,बँक अधिकारी, उत्तम गृहिणी ,तसेच संस्था सांस्कृतिक क्षेत्रात विविध सण उत्सव महोत्सव यासाठी महिला संघटना पुढाकार घेऊन कार्य करताना दिसून येतात अशा प्रकारे शिक्षण हे मोठ्या प्रमाणावर महिलांना सशक्त बनवते दुख या गोष्टीच वाटत की,आजही महिलावरिल अत्याचार कमी झालेले दिसत नाहीत!या बाबतीत सर्वानी जागरूक राहणे,जागरूकता करणे ही काळाची गरज आहे…!

Related posts