उस्मानाबाद 

वाढत्या कृषी उत्पादनासोबत पर्यावरण समतोल सांभाळणे गरजेचे. – बी. पी. किरवले (प्रकल्प उप संचालक, आत्मा.)

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद दि ०३ ( प्रतिनिधी) – ‘कृषि निविष्ठा विक्री करत असताना फक्त नफा लक्षात घेऊन रासायनिक खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी निविष्ठा विकण्यापेक्षा पर्यावरण समतोल संरचना तसेच रासायनिक कीटकनाशकांचा पिकावरील व फळा वरील शिल्लक अवशेष यांचा मानवी जीवनावर व नैसर्गिक स्रोतांवर होणारा परिणाम याचा विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प उपसंचालक माननीय श्री बी.पी. किरवले यांनी केले. ते कृषी महाविद्यालय आळणी गड पाटी येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता कीटकनाशक व्‍यवस्‍थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (NIPHM) व कृषी महाविद्यालय, आळणी (गडपाटी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम कृषि महाविद्यालय, आळणी येथे राबवला जातो. त्याचे उद्घाटन आत्मा प्रकल्प उपसंचालक बी. पी. किरवले यांच्या हस्ते करण्यात आले. कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी आता जमिनीची पोत, आरोग्य जैव परिसंस्था विचारात घेऊन रासायनिक कीटकनाशकांचा वर्गवारी प्रमाणे निसर्गाला हानी न पोहोचवनाऱ्या कीटकनाशकांची विक्री करावी,असेही आपल्या मार्गदर्शनामध्ये ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी नेहमी बदलत्या तंत्रज्ञानाचा व शास्त्रज्ञांनी घालून दिलेल्या नियमांचा वेळोवेळी अभ्यास करून कृषी निविष्ठांची विक्री करणे गरजेचे आहे. कृषी निविष्ठा विक्री करते वेळी पर्यावरणासाठी घातक ठरलेल्या व शासनाने वेळोवेळी बंदी आणलेल्या रासायनिक कीटकनाशकांची विक्री थांबवणे गरजेचे आहे व या बारा आठवड्याच्या काळामध्ये आधुनिक रासायनिक कीटकनाशकांच्या प्रमाणांचा, वर्गवारीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने पूर्ण वेळ उपस्थित राहून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे असे आवाहन केले. तसेच उपस्थित काही कृषि निविष्ठा विक्रेते खूपच वयस्कर असून या वयातही त्यांची ज्ञान घेण्याची जिज्ञासा कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री कालिदास बंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. के. ए. बुरगुटे यांनी केले.
यावेळी प्रा.फडतरे, प्रा. नंदकिशोर सुतार, प्रा.दळवी सतीश, प्रा.सचिन खताळ, प्रा.शेटे डी.एस., प्रा.भालेकर एस. व्ही., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा.गायकवाड पी.ए., प्रा.पवार ए.डी., प्रा.गार्डी ए. जि., प्रा.साठे एम.पी. प्रा.जगधाने एस.एम., प्रा. नागरगोजे व्ही. टी., व प्रा.श्रीमती पाटील एस.एन, प्रा.साबळे एस.एन, प्रा. वाकळे ए.जी. प्रा.आर.एस.पठाण हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे, सुतार रामचंद्र, गुलाब मुजावर, गावठे दत्तात्रय व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले

Related posts