Blog

उत्कृष्ठ व्यवस्थापक व आदर्श व्यक्तिमत्व – प्राचार्य श्रीमान घोड़के सर

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

मित्रानो आज आपण एका आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ या. आज आपण ज्याची माहिती घेणार आहोत ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुलजापुर येथील श्री तुलजभवनी सैनिकी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री वैजनाथ घोड़के होय. सैनिकी विद्यालयाचे उस्मानाबाद जिल्ह्याच नव्हे तर महारास्ट्रभर ज्यानी आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाने,आदर्श व्यक्तिमत्वाने उतुंग आशा कार्याने विद्यालयाचा नावलौकिक केलेला आहे त्यांच्या गुणवैशिष्ट्ये बद्दल कार्याबद्दल चरित्राबद्दल थोडक्यात माहिती पाहूया.

गेल्या वीस वर्षापासून अखंड सेवेत विद्यार्थी शाळा शिक्षक परीक्षा शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन शाळेचे विविध प्रकल्प उपक्रम शालेय क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणारे वेळोवेळी शिक्षकांना कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा विश्वास प्राप्त करून घेऊन सर्व कामकाज वेळेत व व चोख करून घेणारे एक उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून चर्चेत आलेले ले एक रुबाबदार पण खेळकर व्यक्तिमत्व होय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणवैशिष्ट सकारात्मक विचारसरणी ठेवून समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी विधायक कार्य हाती घेऊन जिद्द व तळमळीने कार्य करणारे प्रत्येक शिक्षक आतील कलागुण ओळखून त्यांना विशिष्ट वेळी विशिष्ट न्याय देणारे त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सर्वांना समान न्याय देणारे प्राचार्य म्हणजे आमचे सर्वांचे विद्यालयाचे लाडके प्राचार्य श्रीमान घोडके सर होय.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारा संचलित श्री श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे सर्व वरिष्ठ संस्था व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वस्तीगृह विभाग यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून गेली वीस वर्षापासून कार्यरत आहेत 15 ऑगस्ट 1995 स्थापना झालेल्या शाळेचे स्वरूप आज खूप मोठे व वाखाणण्याजोगे झाले आहे. “इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी” असेच म्हणावे लागेल. सैनिकी विद्यालय तुळजापूर या शाळेतून आज पर्यंत नेव्ही मध्ये बरेच विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत तसेच डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक, शास्त्रज्ञ, पी. एस. आय. तसेच आयएएस अधिकारी सुद्धा घडलेले आहेत.

सुंदर शाळा, शाळेचा परिसर प्रसन्न वातावरण स्वच्छता व साफसफाई जणू वनदेवी चे आगमन झालेले असावे. सरस्वती माता प्रसन्न झालेली असावी. या वातावरणात विद्यार्थी मनोभावे शिक्षण घेत असतात. तुळजापूर शहराच्या दक्षिणेस बालाघाटाच्या डोंगर कपारी वर सुंदर देखणे व टुमदार शाळेची इमारत आपल्याला दिसून. येते कडक अशा उन्हाळ्यात हिरव्यागार वनराईने नटलेली सुंदर शाळा कुणालाही बघणार्‍याला हेवा वाटावा असे शाळेचे सौंदर्य. पहाटे पाच वाजल्यापासून पक्षांचा किलबिलाट च तसेच छोट्या-छोट्या बालकांचा आवाज कानी येतो. प्रातःकाळी मैदानावर सैनिकी ड्रेस घातलेले छोटे छोटे बाल जवान नवजवान परेड व संचलनाच्या या कार्यासाठी तत्पर असतात. विविध प्रकारचे वृक्ष वेली फुलझाडी हिरवीगर्द बाड, सुंदर सुंदर विविध रंगांचे चे वेगवेगळी वेली फुले शाळेच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. या सर्वांचे श्रेय जाते ते ते तेथील सर्व कर्मचारी, वृंद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्ती गृह विभाग प्रमुख, बागेची देखभाल करणारे सर्व इतर कर्मचारी व या सर्वांना एकत्र घेऊन शाळेचा विकास प्रगती घडवून आणणारे आमचे लाडके प्राचार्य श्रीमान घोडके सर.

एक आदर्श विद्यालय म्हणून एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण जिल्हाभर त्यांच्या कार्याचे कौतुक केले जाते. विद्यार्थ्यांसाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवणे, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान शिक्षकांच्या मदतीने कला-क्रीडा शिक्षकांच्या साहाय्याने राज्य स्तरावर विद्यार्थी पोहचवणे, तसेच राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्याने शाळेचे नावलौकिक केलेले आहे विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यात देखील विद्यालयाने अनेक पारितोषिक पटकावले आहेत 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय उत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर, व्याख्यान माले चे कार्यक्रम वेळोवेळी विद्यार्थी व पालक मेळावे घेणे, विद्यार्थ्यांचे संचलन परेड, सैनिकी कॅम्प घेणे असे अनेक उपक्रम राबवून प्रगतिशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे. प्राचार्य असून सुद्धा विनम्रता हे त्यांचे गुण वैशिष्ट आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साध्य करावा, त्यासाठी त्यांची सतत धडपड चालू असायची. विद्यार्थ्यांसोबत चर्चा, शिक्षकांसोबत चर्चा, विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, अभ्यासक्रमात केला जातो.

आजच्या कोरोना च्या या काळात इयत्ता नववी ते बारावी ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग सुरू आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन अभ्यासाची व्यवस्था विद्यालयाने केलेली आहे. हे हा त्यांचा एक स्तुत्य उपक्रम मानावा लागेल. आपला विद्यार्थी अपडेट असला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांसोबत आपले शिक्षक सुद्धा अपडेट असलेच पाहिजेत हीच त्यांची मनोमन धारणा असावी. म्हणून प्रत्येक शिक्षकांनासुद्धा वेळोवेळी त्या त्या विषयांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. शाळेच्या भौतिक सुविधेसाठी सुद्धा वरिष्ठांकडे वेळोवेळी धाव घेऊन हक्काने ते मिळून घेण्यात त्यांचे खरे यश मानावे लागेल. शाळेवर मनापासून प्रेम करणारे, सुट्टीदिवशी दिवसभर काम करणारे, सुट्टी विना काम करणारी प्राचार्य म्हणून त्यांचा गौरव करावासा वाटतो. समोरचा व्यक्ती लहान असो की मोठा, प्रत्येकाशी विनम्रपणे बोलणे, त्यांचे प्रश्न समस्या ऐकून घेणे व त्यांचे योग्य समाधान करणे हा त्यांचा खास गुण होय. एखादा कर्मचारी कितीही रागात आला तरी त्याला आपल्या मधुर वाणीने अत्यंत विनम्र भाषेने त्याचा राग दूर करून आनंदाने आपलंसं करून त्याच्याकडून काम करून घेण्याची कसब त्यांना अवगत आहे. विनम्रता, खेळकर वृत्ती, पदाचा मान, अभिमान नसणे हेच ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. अशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी नवे युवकांसाठी एक सकारात्मक ऊर्जा देणारे प्रेरणा देणारे कार्य विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास त्यांच्या भविष्यासाठी व पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा . . . !

धन्यवाद।🙏🏻🙏🏻

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी.

Related posts