अक्कलकोट

भाजप कार्यकर्त्यानी शेतकऱ्यांत जागृती निर्माण करून कृषी कायद्याचा लाभ समजावून सांगा – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
भारतरत्न पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `प्रधानमंत्री किसान सन्मान निधी`वाटपाचा ऑनलाईन वितरण कार्यक्रम संपन्न झाला.तो कार्यक्रम अक्कलकोट येथील लोकापूरे मंगल कार्यालयात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या संयोजनातून लाईव्ह दाखविण्यात आला. प्रारंभी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी,आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन,प्रभाकर मजगे,गुंडप्पा पोमाजी, अंकुश चौगुले यांच्यासह नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमपूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले शेतकरी बांधवात या कृषी कायद्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणताही परिणाम होणार नाही.उलट याने ते चांगले नफ्यात येतील तसेच शेतकऱ्यांना या कायद्याची नीट माहिती देणे आणि त्यातले फायदे त्यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक आहे.

यासाठी अक्कलकोट तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेतकरी बांधवात जाणे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे.विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे हित न पाहता निव्वळ राजकारण करीत आहे.हे त्यांच्यात जागृती करणे आवश्यक आहे.त्यानंतर लाईव्ह कार्यक्रम दाखविण्यात आला.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी सन्मान रक्कम खात्यावर जमा करून या कायद्याचे लाभ व उपयोजिता स्पष्ट केले.तसेच अनेक शेतकऱ्याशी संवाद साधून त्यातले बारकावे सांगून त्यांचे मत आणि म्हणणे विचारून घेतले. या लाईव्ह कार्यक्रमाने पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नवे कृषी कायदे व त्याचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली असे उपस्थितानी स्पष्ट केले

यावेळी आणप्पा बाराचारे,अप्पासाहेब पाटील, महेश पाटील, राजेंद्र बंदिछोडे, दयानंद बिडवे, सुनिल गंवडी, दिपक जरीपटके, प्रदिप पाटील, नागराज कुंभार, कांतु धनशेट्टी, विक्रम शिंदे, आलम कोरबू, अंबण्णा चौगुले, अंबादास कामनुरकर, रमेश कापसे, बंटी राठोड, छोटू पवार, सोमनाथ पाटील, डॉ. शिवशरण काळे, सुधीर मचाले, ऋषि लोणारी, शिवशंकर स्वामी संजय राठोड, वैभव हलसगी, बंडू काळे, राहूल काळे, ओंकार बिराजदार, वाहिदपाशा शेख, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts