उस्मानाबाद  तुळजापूर

पिंपळा (खुर्द) येथील मनरेगा च्या कामात अर्थिक गैरव्यवहार.

तुळजापूर तालुका प्रतिनिधी/ पुरूषोत्तम विष्णु बेले

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथे मनरेगा च्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार गावातील ग्रामस्थ नेताजी डांगे यांनी दिली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुळजापूर पंचायत समिती च्या मार्फत सन २०१६ ते सन २०२० या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या कामात सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, व इतर अधिकारी वर्गाने लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे प्रथमतः रोजगार सेवक यांच्या नातेवाईक यांना या योजनेचा लाभ दिला गेला. नंतर सामान्य नागरिकांना सिंचन विहिरीचा लाभ दिला विहीर लाभ धारकांकडून प्रति लाभधारक ४०००० अशी रक्कम घेतली. गावात हजारो लोक बेरोजगार असताना एकही सिंचन विहीर ही मजूरांच्या सहाय्याने न करता कामे यंत्राच्या व मशीन च्या सहाय्याने करण्यात आली, प्रत्येक विहिरीवर जॉब कार्ड हे रोजगार सेवक यांच्या घरच्या व्यक्ति ची जोडली आहेत, कित्येक विहीरीचे काम अपूर्ण असताना देखील पूर्ण दाखवले गेले, कित्येक जुन्या विहिरींचे गाळ काढून नवीन सिंचन विहीर खोदल्याचे दाखवून ५० फूटांपर्यंत विहीर न नेता पूर्ण दाखवले विहिरींचे जिओ टॅगिंग चुकीच्या प्रकारे करत शासकीय नियमांना धाब्यावर बसवून काम करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप नेताजी डांगे लाभ धारकांनी यांनी केला आहे.

सदरील कामाची लवकरात लवकर तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी डांगे यांनी गटविकास अधिकारी, पं.स. तुळजापूर., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद., जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच ऑनलाइन “आपले सरकार” पोर्टल द्वारे मा. मुख्यमंत्री यांना ही या झालेल्या गैरव्यवहार बाबत कळविण्यात आले आहे.

Related posts