पंढरपूर

पदवीधर मतदार संघाचा नाव नोंदणी कार्यक्रम अंतिम टप्प्यात

पंढरपूर –
महाराष्ट्रात विधानसभा व विधानपरिषद दोन कायदेमंडळ सभागृह आहेत महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी दोन कायदेमंडळे पद्धती अस्तित्वात आहे यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश , कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो या राज्यांमध्ये विधानसभे सोबत विधानपरिषदेचे कामकाज चालते त्याची निवडणूक कशी पार पडते हे सांगण्याची गरज नाही परंतु विधान परिषद सदस्य निवड याची कल्पना असणे गरजेचे आहे आपल्याकडे ग्रामपंचायत निवडणूक पासून ते लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु पदवीधर संघाच्या निवडणुकीला फारसं गांभीर्यानं घेतलं जात नाही कित्येकांना अशी निवडणूक असते असे माहीतच नसते. .

आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकासाठी गेली अनेक दिवस नव्याने मतदार नाव नोंदणी सुरु आहे तरीदेखील अनेक पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे गांभीर्य घेतले नाही . आता फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. आता तरी नाव नोंदणी करून घ्यावी कारण गत दोन पंचवार्षिक निवडणुकीची मतदार जुनी यादी रद्द करण्यात आलेली आहे. आता जे नव्याने मतदान यादीत नाव-नोंदणी करतील त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल.
महाराष्ट्रात विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य कार्यरत असतात त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून , 12 सदस्य राज्यपालांच्या नियुक्ती मधून, सात सदस्य शिक्षक मतदारसंघातून तर सात सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडले जातात.

विधानपरिषदेच्या सदस्यांचा निवडणूका एकाच वेळी होत नाहीत विधानपरिषद हे कायम सभागृह असते त्यातील सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो परंतु दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. महाराष्ट्रात सात पदवीधर मतदार संघ आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या मतदारसंघाचा समावेश होतो.

पुणे पदवीधर मतदारसंघात पाच जिल्हे असून त्यामध्ये 58 तालुके तर 6669 गावाचा समावेश आहे
गतपंचवार्षिक निवडणुकिपेक्षा मतदान नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत चार लाखाच्या वर मतदार नोंदणी झाली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा,सांगली ,कोल्हापूर,सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके असून 1912 गावांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुके १७१९ गावे आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुके असून ७३५ गावे आहेत कोल्हापूरमध्ये १२ तालुके १२३९ गावांचा समावेश आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ११ तालुके असून १०६४ गावांचा समावेश आहे


पदवीधर मतदारांनी न्याय हक्काच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करावी –
– दिपक चंदनशिवे (आर.पी.आय.,आठवले गट) युवक आघाडीचे प्रदेश संघठन सचिव

ज्या मतदारांनी नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी त्वरीत नाव नोंदणी करून आपल्या न्याय हक्काला लढा देण्यासाठी पदवीधर मतदार बंधू-भगिनीनी प्रचंड संख्येने नाव नोंदणी करावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) युवक आघाडीचे प्रदेश संघठन सचिव दीपक चंदनशिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Related posts