उस्मानाबाद  तुळजापूर

बोरनदीवाडी (नळ) येथे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अँप विषयी मार्गदर्शन.

ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या तेजश्री गोंगाणे यांच्याकडून स्तुत्य उपक्रम.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – बोरनदीवाडी (नळ) ता. तुळजापूर येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अँप विषयी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित व कृषी महाविद्यालय, उस्मानाबाद संचलित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन बोरनदीवाडी (नळ), ता. तुळजापूर येथे करण्यात आले होते. यादरम्यान कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या तेजश्री गोंगाणे यांनी गावातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अँप विषयी कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण दिले.

महसूल विभागाच्या वतीने “माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार, माझा पिकपेरा अंतर्गत शेतकऱ्यांना स्वताःच्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद करता येणार आहे. या प्रकल्पाद्वारे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पिकविमा योजना, पिककर्ज वाटप तसेच कृषी विभागाच्या ईतर योजनांसाठी याचा वापर करता येणार आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अँप द्वारे आपल्या खरीप, रब्बी व बहुवार्षिक पिकांचा पिकपेरा स्वःताला भरता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपले गट क्रमांक किंवा खाते क्रमांक याद्वारे माहिती भरून नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर अँपच्या माध्यमातून जीपीएस असलेला फोटो अपलोड करुन आपली पिक पहाणी पुर्ण करता येणार आहे. यासाठी शासनाने खरीप 2021 हंगामासाठी पिक पहाणी भरण्यासाठी मर्यादित कालावधीची मुदत देण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी कृषिकन्यांकडून करण्यात आले. एकदा पिकांची माहिती भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. शेतकऱ्यांनी अँप मध्ये माहिती भरताना पिकांची व क्षेत्राची माहिती काळजीपूर्वक भरावी. काही अडचण येत असल्यास तलाठी, कृषीसहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषिकन्या तेजश्री गोंगाणे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला कृषिकन्या तेजश्री गोंगाने यांच्यासह राजकुमार भोसले , विजय गोंगाणे, मोहन शिंदे,नवनाथ सुरवसे, राजकुमार गोंगाणे,तानाजी चव्हान यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. जे. बी.तवले मॅडम , प्रा. डॉ. पाटील सर, प्रा. डॉ थोरात सर, यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ.जहागीरदार सर , यांच्यासह महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापकवृंद यांच्या मार्गदर्शनाने कृषिकन्या तेजश्री गोंगाने यांच्यामार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम बोरनदीवाडी (नळ) येथे घेण्यात येत आहे.

Related posts