तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, स्त्री शिक्षण दिन व बालिका दिवस साजरा.

👩‍👧‍👧📚🖋️
लेक वाचवा, लेक शिकवा…!

साईनाथ जगन्नाथ गवळी
(विभागीय संपादक – मराठवाडा विभाग)

स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने स्त्री शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, स्त्री-शिक्षण दिवस व बालिका दिवस साजरा करण्यात आला.

श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर व विद्यालयातील शिक्षिका श्रीमती पाटील मँडम, श्रीमती नाशे मँडम, श्रीमती माने मँडम यांच्या हस्ते करण्यात आले. स्त्री शिक्षण दिनाचे औचित्य साधून पर्यवेक्षक डॉ. पेटकर सर यांच्या हस्ते विद्यालयातील महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुरवसे भीमा, श्री वाडीकर सुनिल, श्री पडणूर राजेश, श्री स्वामी रमाकांत, श्री पांचाळ देविदास, श्री सुत्रावे तुषार, श्री माने ज्ञानेश्वर, श्री चव्हाण सुनिल, डॉ. विजय वडवराव, श्री जलील हिप्परगी व मगर मिलिंद यांनी परीश्रम केले.

Related posts