उस्मानाबाद  लातूर

औसा तालुक्यात खा. ओमराजे निंबाळकर यांचा आरोग्यविषयक पाहणी दौरा.

तपासणी साठी येणाऱ्या रुग्णाची माहिती घेत, त्यांची विचारपूस करत, रुग्णांना दिला धीर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.

लातूर – लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अनेक प्रमुख आरोग्य केंद्रांना भेटी देत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आरोग्य सुविधा, कोरोना परिस्थिती तसेच रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा, औषधोपचार यांची माहिती घेत रुग्णांना धीर दिला.

या दौऱ्यात, औसा येथिल ग्रामीण रुग्णालय, लामजना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात उभारण्यात आलेले कोविड सेंटर, कासार शिरशी येथील ग्रामीण रुग्णालय, मोगरगा ग्रा. पं. कार्यालयातील लसीकरण कॅम्प, किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालय अशा प्रमुख आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. तसेच प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांचा संदर्भात तेथील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.


औसा येथिल ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. तेथील परिस्थिती संदर्भात सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात प्रभावी पणे राबवून घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात अशा प्रकारच्या सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संबंधित यंत्रणेला केल्या.


किल्लारी ता. औसा येथिल ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली.

कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र व राज्यसरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार नागरिकांना व्हॅक्सीन लसदेण्याचा वेग वाढवावा. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात यावी अशा सुचना ता.आरोग्य अधिकारी यांना दिल्या. या कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, नर्स तसेच अन्य सर्वांनीच आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे असे यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना सांगितले.


मोगरगा ता. औसा ग्रामपंचायत कार्यालयाचा वतीने गावातील ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींना कोरोना लसीकरण डोस देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला सदिच्छा भेट दिली.

ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी स्टाफ ठेवावेत तसेच तात्काळ जनरेटरउपलब्ध करून घ्यावेत तसेच महावितरणने २४ तास वीज पुरवठा सुरू ठेवावा अशा सूचना संबंधीत विभागाला यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी केल्या.


कासार शिरसी येथिल ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.

कोरोना काळात प्रभावी काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मानधन तात्काळ देण्याचा गट विकास अधिकारी यांना सुचना दिल्या. रुग्णांची गैरसोय होणार नाही. त्यांना वेळेवर, योग्य आरोग्य सुविधा मिळतील याची दक्षता घ्यावी असे खा. निंबाळकर यांनी सांगितले.


लामजना ता. औसा, येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली.

होम आयसोलेशन केलेले रुग्ण तसेच नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नागरिक सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास कार्यवाही करावी. असे निर्देश पोलीस प्रशासनास दिले मा. खा. ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी दिले.

तसेच कोरोना संक्रमन रुग्णांनी व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, घरात हि मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यावेळी नागरिकांना केले.

यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह अनेक स्थानिक शिवसेना पदाधिकारी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

Related posts