अक्कलकोट दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे मंद्रुपमध्ये कांचन फाऊंडेशनच्यावतीने आदर्श पत्रकार व कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान.

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर येथील मंद्रुपमध्ये कांचन फाऊंडेशनच्या वतीने श्री मळसिद्ध देवालय मंद्रुप येथे संपन्न झालेल्या आदर्श पत्रकार व कोविड योद्धा पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. यावेळी गेल्या वर्षभरात कोरोना काळात विविध क्षेत्रात महामारीशी संघर्ष केलेल्या व सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोविड योद्धा व ६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी म्हणजे पत्रकार दिनानिमित्त तालुका दक्षिण सोलापूर येथील पत्रकारांचा कांचन फाऊंडेशनचे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी कांचन फाऊंडेशनचे संस्थापक सुदीप चाकोते,मंद्रुप पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, युवराज राठोड,अकील कुडले,प्रा.उमाशंकर रावत,अप्पू शेख,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष गौरीशंकर मेंडगुदले,डॉ.शिवानंद झळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ.झळके,प्रा उमाशंकर रावत,अनंत म्हेत्रे,व कांचन फाऊंडेशनचे संस्थापक यांनी पत्रकारांच्या विविध समस्येवर व पत्रकार देश घडवण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात या बद्दल मत मांडले.आदर्श पत्रकार व कोविड योद्धा पुरस्कार कार्यक्रमाला पत्रकार रेवणसिद्ध मेंडगुदले,अशोक सोनकंटले,अमोगसिद्ध लांडगे, श्रीकांत हाले,नितीन वारे,अमोगसिध्द मुंजे,महासिद्द साळवे,तुकाराम शेंडगे,इलियास शेख,धर्मराज पुजारी,शिवय्या स्वामी,नागेश कोळी,हसन नदाफ,यांच्या सहीत वेगवेगळ्या वृत्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते.
.
हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी कांचन फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष संजीवकुमार लोणारी व कांचन फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts