दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बनतंय होटगीगाव राजकीय केंद्रबिंदू

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी/दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीगाव हे विविध राजकीय पक्षांचे केंद्रबिंदू ठरत असल्याने या गावाचे नाव राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखले जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रमुख मोठ्या गावांपैकी एक असलेल्या होटगी गावातच भाजप व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. हे गाव पंचायत समिती गण म्हणून परिचित असून या गावाने विविध राजकीय पदांवर व्यक्ती काम केल्याचे अनुभवले आहे. कै.गुरुनाथ पाटील हे म्हणून विधानसभेवर निवडून इमदार गेले आहेत. सध्या त्यांचे सुपुत्र दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील हे तालुक्याचे अध्यक्ष या नात्याने नेतृत्व करीत आहेत. मरगळलेल्या काँग्रेसला ऊर्जितावस्था देण्यासाठी तालुक्यातील विविध गावात त्यांनी काँग्रेसची शाखा स्थापून माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे , कॉंग्रेसचे बाळासाहेब शेळके, जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, भीमाशंकर जमादार, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, नगरसेवक बाबा मिस्ञी या कॉंग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकार्‍यांना घेऊन गाव तिथे शाखा काढण्यात ते मग्न आहेत. तसेच विकासासाठी प्रयत्न करीत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सलग दहा वर्षे भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले व दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला उधळून लावून भाजपचा झेंडा रोखण्यात यश मिळवले आहे. भाजपचे तत्कालीन सहकारमंत्री व विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना या मतदारसंघात दोनवेळा निवडून आणण्यात त्यांनी भूमिका बजावली आहे. चिवडशेट्टी हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालकदेखील आहेत. रामप्पाचिवडशेट्टी यांना विविध पदांवर असलेल्या संघटन कौशल्याच्या जोरावर ते तालुक्यात भाजप पक्ष वाढवत आहेत. त्यांना आमदार सुभाष देशमुख यांचे सहकार्य लाभत असून आगामी काळातदेखील ते मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून तालुक्‍याचा कायापालट करणार असल्याचेही चिवडशेट्टी यांनी सांगितले.
काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांचे प्राबल्य असलेले होटगीगाव नेहमीच राजकीय केंद्रबिंदू ठरत आहे. यापूर्वी याच गावात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून दत्ता घोडके तर शिवसेनेचे गंगाराम चौगुले यांनी तालुकाध्यक्षपदावर काम केले आहेत.सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीगाव राजकीय घडमोडीत अग्रेसर असल्याचेही सर्वत्र चर्चिले जात आहे.

दक्षिण सोलापूर तालुका भाजपमय करण्यात यश
दक्षिण सोलापूर तालुका तसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. दोनवेळा या तालुक्याने भाजपला साथ दिली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या च्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे चालू आहेत. आगामी काळातही आमदार सुभाष देशमुख व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निधी आणून तालुक्‍याचा कायापालट करणार आहे.

रामाप्पा चिवडशेट्टी
तालुका अध्यक्ष, भाजप

दक्षिण सोलापूर तालुक्यात पुन्हा एकदा चांगले दिवस येतील

सध्या असलेली भाजपची सत्ता उलथवून टाकून आगामी काळात पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. गाव तिथे शाखा काढण्यासाठी नागरिक साथ देत आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवत आहेत. या विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा दक्षिण तालुका काँग्रेसमय करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.

हरीश पाटील
तालुका अध्यक्ष, काँग्रेस

Related posts