Blog

विनम्रता व सहनशीलता – मानवाचे अमूल्य मूल्य !

लेखक
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

-_——————————–

मानवी जीवनातील मानवाच्या प्रगतीसाठी मानवाच्या संस्कृतीतील सर्वात महत्वाचे वैशिष्ट मानवाला योग्य दिशा योग्य मार्ग सकारात्मक विचार गुरु जवळ नेण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग जवळचा मार्ग म्हणजे विनम्रता होय माणसाच्या अंगी असणारा सर्वात महत्त्वाचे मानवी मूल्य माणुसकीचे मूल्य म्हणजे विनम्रता होय जीवनात प्रत्येकाच्या अंगी विनम्रता असली पाहिजे त्याच्या अंगी असणाऱ्या विनम्रपणा मुळेच तो कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो मग ते कोणतेही क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र शेती उद्योग धंदे नोकरी असो प्रत्येक गाणे काम करताना त्याच्या अंगी विनम्रता असली पाहिजे विनम्रता हा मानवाचा एक सुंदर अलंकार आहे उत्कृष्ट व देखना दागिना आहे विनम्रतेने मुळे माणसाचे चरित्र अधिक खुलून दिसते

भाषेला अलंकाराने सौंदर्य येते भाषेचे सौंदर्य खुलते अगदी तसेच मानवाच्या अंगी जर विनम्रता असेल तर तो त्याचा मूल्यवान दागिना किंवा अलंकार ठरतो माणसाच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार होय इतिहास आपल्याला सांगतो की अहंकारामुळे माणूस माणसात राहत नाही रावणाची सोन्याची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपूचा वध कंस मामाचा वध हा अहंकार रुपी राक्षसाने केला विनम्रता व अहंकार या एकमेकाच्या बिलकुल विरुद्ध बाबी आहेत विद्या विनयेन शोभते विद्यार्थी हा ज्ञान सागरात पोहणारा राजहंस आहे विद्या ही ज्यांच्याकडे नम्रता आहे त्यालाच शोभून दिसते व त्यालाच प्राप्त होते व तो विद्यार्थी गुणसंपन्न ज्ञानसंपन्न बनतो

आज आधुनिक काळात मूल्य शिक्षण नैतिकतेचे शिक्षण देण्याची गरज भासत आहे कारण आजचा विद्यार्थी हा तंत्रज्ञानामुळे अबोला होत चालला आहे तो बोलतो ते फक्त मोबाईलची खेळतो तो फक्त टीव्ही तंत्रज्ञानामुळे त्याचे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होत चालले आहे शारीरिक हालचाल व्यायाम फिरणे विविध खेळ यापासून दुरावत चालला आहे व त्याचा मानसिकतेवर आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे विनम्रता मानवाच्या सुसंस्कृती सुनीती नैतिकता मूल्यांशी जोडलेला एक एक धागा आहे नम्रतेचा धागा जोडून माणुसकीचा जिव्हाळा निर्माण केला पाहिजे तर लोक आपल्याजवळ येतील व आपल्याला मदतीचा हात देतील काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा लपलेला असतो विचारात एक सकारात्मक तेज असते बोलण्यात नम्रता असते वागण्यात सौजन्य असते आणि त्यांच्या हृदयात स्नेहाचा झरा वाहत असतो

विनम्रता आणि सहनशीलता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मला वाटते जशी विनम्रता आपल्या अंगी असावी लागते तशीच सहनशीलता देखील असली पाहिजे काहीही झाले कितीही राग आला तर मन शांत ठेवून त्यावर विचार केला पाहिजे हे असे का झाले का होते अत्यंत सहनशील वृत्तीने आपले कार्य पार पाडले पाहिजे सहनशीलता म्हणजे देणे नव्हे घाबरणे नव्हे तर आत्मविश्वासाने आपल्या मनावर ताबा मिळवणे होय शांत राहणे व आलेल्या संकटातून समस्येतून संयमाने मार्ग काढणे मन स्थिर असल्यास आपले विचार भरकटत नाहीत स्थिर विचार आपल्याला यशाचा रस्ता न चुकता दाखवतात जे स्वतः विचार करतात स्वावलंबी विचाराचे असतात तेच सहनशीलतेने आपले कार्य करतात म्हणून प्रत्येकाने विचार पूर्वक संयमाने व सहनशील तेने समाजात वागले पाहिजे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की ज्या व्यक्ती जवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये ते कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते तसेच समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली ो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे हे मिळवणे प्रत्येकाच्या स्वतःच्या मानसिकतेवर अवलंबून आहे

सकारात्मक मानसिकता चांगले विचार चांगले आचार चांगली भाषा आपले दुःख ते दुसर्‍याचे दुःख समजणे दुसऱ्याबद्दल तळमळ व आपण नेता असणे हीच खरी माणुसकी होय जीवनात यशाच्या शिखरापर्यंत पोहचविण्यासाठी या दोन बाबी खूप महत्त्वाच्या आहेत विनम्रता व सहनशीलता विनयशीलता व सहनशिलतेचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला प्राचीन ऐतिहासिक सर्व ग्रंथांच्या महान चरित्र मधून बघायला मिळते जसे रामायण ग्रंथातील प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्र,राजा हरिश्चन्द्र कितीही संकटे आली तर संयम विनयशीलता व सहनशीलता त्यांनी कधीही सोडली नाही एक आदर्श संपूर्ण जगाला दिला तो आपण घेतला पाहिजे व कुठल्याही वेळी कुठल्याही प्रसंगी योग्य दिशेने योग्य विचाराने पाऊल टाकले तर आपले जीवन यशस्वी होईल। कुठलाही व्यक्ती अचानक यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही पहिली पायरी सोडून अचानक शेवटच्या पायरीवर जाता येत नाही अगदी तसेच जीवनाच्या वाटेवर एक एक पायरी टप्प्याटप्प्याने मेहनत करीत श्रम करीत पुढे जायचे असते यश आपोआप आपल्याला मिळते आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी विनम्रता व सहनशीलता असली म्हणजे जे यश आपलेच समजा।

धन्यवाद

Related posts