उस्मानाबाद 

“नव्हतं ग सोप्प सावित्री होण, बाई च्या जन्माचा केलं तू सोनं…”

कृषी महाविद्यालय आळणी येथे सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर…

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद ता. ०३ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणासोबत नेहमी सामाजिक जाणिवेचे धडे देण्यात अग्रेसर असणारे कृषि महाविद्यालय आळणी (गडपाटी) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘बालिका दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. पाटील एस. एन. यांनी मुलींना शैक्षणिक तसेच आर्थिक स्वावलंबनाचे धडे दिले. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्या म्हणाल्या की, “सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात स्त्री शिक्षणाची बीजे रोवली ती परिस्थिती लक्षात घेता त्यांना शिक्षण देणारे त्यांचे पती श्री. महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान प्रेरणादायी आहे. समाजातील सर्व पुरुष यांनी जर यातून प्रेरणा घेतली व घराघरात आपापल्या मुलींना व भगिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार दिला तर सावित्रीबाईंच्या प्रयत्नांना यश येईल आणि महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण वाढून महिला स्वावलंबी बनतील”.

कृषी अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका साबळे एस. एन. विद्यार्थिनींना संबोधित करताना म्हणाल्या की, “सावित्रीबाईंच्या कर्तुत्वाला आदरांजली द्यायची असेल तर तरुण मुलींनी सावित्रीबाईंनी खुल्या केलेल्या स्त्री शिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये अव्वल स्थान मिळवावे लागेल. स्वातंत्र्य उपभोगतानाच सामाजिक जाणीवा लक्षात घेऊन आपल्या ध्येयाचा विसर पडणार नाही यासाठी अविरत प्रयत्नशील रहावे, कुठल्याही सामाजिक अडचणींचा सामना धैर्याने करावा व ध्येयप्राप्ती करावी”.

कार्यक्रमामध्ये पुढे प्राध्यापक गुरव पी. के., बंडे के. डी. सुतार एन. एस. यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये निरगुडे अमृता, इनामदार कृष्णाई यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. महाविद्यालयीन विद्यार्थी सुमित गंगथडे याने कृषी क्षेत्रातील व देशाच्या विकासातील महिलांचे योगदान लक्षात घेता सावित्रीबाईंच्या संघर्ष्याचे फळ आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयीन विद्यार्थिनी राऊत निकिता व चोबे अपेक्षा यांनी केले तर आभार प्रदर्शन आकांक्षा मते हिने केले.

यावेळी प्रा.फडतरे, गुरव पी. के., सुतार एन. एस. प्रा.दळवी सतीश, प्रा.शेटे डी.एस., बंडे के. डी., प्रा.सचिन खताळ, प्रा.भालेकर एस. व्ही., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा.गायकवाड पी.ए., प्रा.पवार ए.डी., प्रा.गार्डी ए. जि., प्रा.साठे एम.पी. प्रा.जगधाने एस.एम., प्रा. नागरगोजे व्ही. टी. व प्रा.श्रीमती पाटील एस.एन, प्रा.साबळे एस.एन, प्रा. वाकळे ए.जी. प्रा.आर.एस.पठाण हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, सुतार रामचंद्र, गुलाब मुजावर, गावठे दत्तात्रय व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

Related posts