महाराष्ट्र

कोरोनाच्या संकटात अनावश्यक खर्चाला फाटा देत पार पडला विवाहसोहळा.

उद्योजक अभिजीत पाटील यांनी दिला संकटाला तोंड देण्याचा अनोखा संदेश.

सचिन झाडे –
पंढरपूर –

पंढरपूर तालुक्यातील शेगांव दुमाला येथे आटकळे- मोहिते आणि आटकळे – आदमिले या कुटुंबातील मुला -मुलींचा साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो.या कर्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व नातेवाईक जमले होते.
या कार्यक्रमासाठी डी.व्ही.पी. उद्योगसमूहाचे प्रमुख अभिजित पाटील उपस्थित होते.

साखरपुड्यातच सर्वत्र पाहुणे एकत्र आला आहात.तसेच कोरोनाचे देखील सावट आहे.तसेच अनावश्यक खर्च टाळून याच ठिकाणी विवाह करावा.असे आव्हान आभिजित पाटील यांनी वर आणि वधू यांच्या पालक व नातेवाईकांना केल्यानंतर आटकळे आणि मोहिते,नागणे कुटुंबांनी होकार देत सोशल डिस्टंसिंगचे पालन करून साखर पुड्यातच लग्न विधी सोहळा पार पडला.

कोरोनाच्या संकटात अनावश्यक खर्चाला फाटा देत अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे पंढरपूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts