दक्षिण सोलापूर

मंद्रुप पोलिस ठाणे मानांकनात पहिल्या पाचमध्ये,विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्र देवून सन्मान.

पुरस्कार श्रेय मंद्रुप पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे – सपोनि नितीन थेटे

अशोक सोनकंटले
/विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

मा.विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोज लोहिया यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वार्षिक तपासणी केली.यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे विविध कार्यातील निकष लावून तपासणी केली.यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून एक उपविभाग व पाच पोलीस ठाणे यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले असून.गेल्या वर्षभरात मंद्रुप पोलीस ठाणेच्यावतीने केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल मंद्रुप पोलीस ठाणे चौथा क्रमांक मिळाला आहे.

मा.विशेष महानिरीक्षक यांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी नितीन थेटे यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आले.यावेळी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील २५ पोलीस ठाणेचे प्रभारी उपस्थित होते.

मंद्रुप पोलीस ठाणेस मिळालेल्या मानांकनाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांची भेट घेतली असता त्यांनी मंद्रुप पोलीस ठाणेतील अधिकारी, अंमलदार,यांचे श्रेय असून त्यांनी मागील काळात प्रचंड मेहनत घेतल्याचे सांगून सर्व पोलीस अंमलदार यांचे कौतुक केले.

Related posts