पंढरपूर

नारायण चिंचोली येथे पांडुरंग परिवाराच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

नारायण चिंचोली( प्रतिनिधी ) –
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पांडुरंग परिवाराच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नारायण चिंचोली येथील पांडुरंग परिवाराचे जेष्ठ शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे परमेश्वर मस्के माजी सरपंच धर्मराज नलवडे माजी उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण सरपंच बळवंत धनवडे मेजर सौदागर गुंड प्राध्यापक दत्तात्रय मस्के सोसायटीचे चेअरमन विष्णू माने माऊली हाडमोडे ज्ञानेश्वर बरडे अभिजीत कवडे श्रीधर कोळेकर सुनील माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनाप्रसंगी बोलताना धनवडे म्हणाले की पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख कै सुधाकर पंत परिचारक यांच्या आशीर्वादाने सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक युटोपियन शुगर चे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पांडुरंग परिवाराचे संपूर्ण जिल्हा यात काम सुरू असून या परिवारामध्ये शेतकऱ्यांच्या तात्काळ अडचणी सोडवण्याच्या उदात्त हेतूने आज नारायण चिंचोली येथे पांडुरंग परिवाराची संपर्क कार्यालय सुरू केले असून या कार्यालयात नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या आडचणी सोडवण्यासाठी संपर्क कार्याशी थेट संपर्क साधावा तसेच नारायण चिंचोली ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व असून नारायण चिंचोली गावातील ग्रामस्थांनी विकास कामाबद्दल असणाऱ्या समस्या संदर्भात व कोणतेही काम असल्यास संपर्क कार्यालयात आपले लेखी व तोंडी समस्या सांगाव्यात त्याचे पांडुरंग परिवाराच्यावतीने तात्काळ निवारण केले जाईल असे आश्वासन धनवडे यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना दिले.

यावेळी माजी सरपंच पोपट विठ्ठल माने नितीन मस्केपाटील दत्तात्रय बनसोडे पांडुरंग क्षिरसागर बाळू बनसोडे माऊली हाडमोडे सचिन घाडगे डॉ अभिजीत कोल्हे महादेव सरडे हरिभाऊ माने धनाजी वसेकर वैजनाथ मस्के अंगद कोल्हे भाऊसाहेब माने मंता बनसोडे मुकुंद घाडगे सचिन गुंड पांडुरंग घाडगे मल्हारी सोनवर किसन गुंड बाळासाहेब सुतार राहुल मलपे सुनील पाटील आदी मान्यवर पांडुरंग परिवाराचे सर्व शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts