उस्मानाबाद  तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील काटी-दहिवडी साठवण तलावाचा, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेत समावेश. ; आ. कैलास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील काटी येथील काटी-दहिवडी साठवण तलावाचा, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती आ. कैलास पाटील यांनी दिली. शिवसेनेचे धाराशिवचे जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिवचे विद्यमान आमदार मा. श्री. कैलास पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे.

काटी ता.तुळजापूर येथील साठवण तलावाचा पुर्ण संचय साठा 2.09 द.ल.घ.मी. असून याची सिंचन क्षमता 252 एच.ए. आहे. सदर तलाव हा मागील 10 वर्षांपासून सरासरी 40 ते 50 टक्के क्षमतेनेच भरत आहे. सदर साठवण तलाव हा कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक 2 सावरगाव ते पांगरदरवाडी कालव्यापासून अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील कायम दुष्काळी भागासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद,बीड जिल्ह्यातील हजारो हेक्टर अवर्षणप्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा कालवा अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरुन जात आहे. परंतु या महत्वाकांक्षी प्रकल्पात या तलावाचा कृष्णा – मराठवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक 2 मध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. हि बाब शिवसेनेचे उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे सदर तलावाचा कृष्णा-मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेत समावेश करुन सावरगाव-पांगरदरवाडी कालव्यातून पाणी सोडून या भागातील सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा, व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्या संदर्भात पाठपुरावा केला होता. या त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या कामास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ मान्यता दिली असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

या काटी-दहिवडी साठवण तलावाचा कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल आ. कैलासदादा पाटील यांचे कौतुक केले जात आहे.

सावरगाव-पांगरदरवाडी कालव्यातून पाणी सोडून या भागातील सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा, व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्या संदर्भात पाठपुरावा करून काटी-दहिवडी साठवण तलावाचा कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेत समावेश केल्याबद्दल, आमचे नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलासदादा पाटील यांचे जाहिर आभार…!

-श्री. जगन्नाथ मनोहर गवळी-भोसले (शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)

Related posts