Blog

भारतीय सेना दिवस – Army Day

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

============================================================================================

आज 15 जानेवारी भारतीय स्थल सेना दिवस, भारतीय सेना दिवस सैनिकांचे नाव काढताच आपल्या अंगावर शहारे येतात शरीर रोमांचित होत देशाच्या सीमेवर रक्षण करताना आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या सर्व त्याग करणाऱ्या आपल्या भारतीय जवानांना सैनिकांना आजच्या या दिनी विनम्र अभिवादन व देशातील सर्व सैनिकांना भारतीय सेना दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

आज सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आपण सर्व जण अनुभवतोच आहे आपले शत्रू राष्ट्र आपल्यावर हल्ला करण्यासाठी आतंक माजवण्यासाठी तयारच आहेत चीन व पाकिस्तान वेगवेगळ्या माध्यमातून भारताचे खच्चीकरण करण्याच्या तयारीत आहेत वेगवेगळ्या डब्ल्यू एच ओ च्या समोर आपले खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आजारांपासून रोगराई तसेच विषाणूंचा फैलाव करून संपूर्ण जगाला त्रासून सोडलेल्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी आपल्या भारताचे सैनिक तयार आहेत जगासमोर भारताचे नाव कमी करण्यासाठी, भारताचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्र करत आहेत गेल्या वर्षभरात कोरोणाच्या अशा काळात कुरघोड्या काही थांबल्या नाहीत पण आपल्या भारताचे नवजवान सैनिक डोळ्यात तेल घालून भारताचे संरक्षण करीत आहेत त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून समर्पण भावनेने देशसेवेचे वृत्त हाती घेतले आहे

आपल्या सैनिका बद्दल जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे वंदे मातरम म्हणून हाती शस्त्र घेतलेल्या सैनिकांनी शेकडो आतंक वादयांचा खात्मा केलेला आपण टीव्हीवर पाहतोच आहेत वृत्तपत्रातून वाचतो आहे आज आपले सैनिक सीमेवर रक्षण करीत आहेत म्हणून आपण आनंदाने राहत आहोत आनंदाने झोप घेत आहोत त्यांच्या या कार्याचे मूल्य हे अमूल्य आहे भारतीय सैन्य शूर वीर व धाडसी आहे शेकडो वेळा चिनी व पाकिस्तानी घुसखोरांना धूळ चारीत नेस्तनाबूत केलेलं आठवा यात आपलेही जवान शहीद झालेले आहेत अशा क्रांतिकारी जवानांना, देशासाठी वीरमरण पत्करलेल्या शहीद जवानांना, आज भारतीय सेना दिनी त्रिवारवंदन !

“ए मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी…!” अशा या जवानांची एक आठवण म्हणून त्यांचा गौरव सोहळा म्हणून या सैनिकांचा मान ठेवण्यासाठी ,आपल्या तिरंगी ध्वजाचा गौरव करण्यासाठी भारतीय सेना दिवस साजरा केला जातो आज आपण 73 वा भारतीय सेना स्थापना दिवस साजरा करीत आहोत स्थल सेनेचा भारतीय सेना दिवस हा सन1949 मध्ये हे भारताचे पहिले कमांडर चीफ मेजर जनरल करिअप्पा भारतीय सेनेचे प्रमुख बनले होते मेजर जनरल करिअप्पा यांनी भारतीय सेना दिवसाची स्थापना केली भारतीय सैन्याचे शौर्य, साहस, दिव्य शौर्यगाथा आणि बलिदान यांचा राजधानी दिल्लीमध्ये गौरव केला जातो मेजर जनरल करिअप्पा मैदानावर सर्व सैनिकांचे स्वागत व सत्कार केला जातो स्वातंत्र्यानंतर जवळपास 5 युद्ध झालेली आहेत पाकिस्तान व चीन सोबत भारतीय स्थल सेनेची ताकद खूप मोठी आहे जगात सर्वात बलशाली आपले सैनिक आहेत आपली सेना आहे कारगिल युद्ध आपल्या समोरील प्रत्यक्ष उदाहरण आहे

देशासाठी शहीद झालेल्या जवानांचा गौरव, त्यांच्या परिवाराचा गौरव करण्यासाठी त्यांना पुरस्कृत करण्यासाठी आजचा दिवस मानला जातो भारतीय सैन्य संपूर्ण देशासाठी देशवासियांसाठी अभिमान व गौरवाचे प्रतीक आहे देशाच्या व देश वासी यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व शूर वीर धाडसी जवानाचा गौरव जितका करावा तितका कमीच आहे भारतीय सैनिकांचा जगात दरारा आहे तसेच त्यांच्याकडे असणारे शस्त्र सुद्धा जगात दरारा निर्माण करणारेच आहेत हे आपण पहिल्या महायुद्धात व दुसऱ्या महायुद्धात तसेच अलीकडे झालेल्या पाकिस्तान चीन युद्धात कारगिल युद्धात पाहिलेच आहे नव्हे तर अनुभवलेले सुद्धा आहे अशा या सर्वात मोठी शक्ती असणाऱ्या भारती सेनेचा आज स्थापना दिवस आजच्या या दिनी सर्व शहिद जवान व क्रान्तिकारकाना कोटी कोटी विनम्र अभिवादन।
जय हिंद। जय भारत।

Related posts