उस्मानाबाद  तुळजापूर

सलगरा येथील प्रा.आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव ; नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांचे आवाहन

प्रतिक शेषेराव भोसले
सलगरा, प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील मुळ रहिवासी असलेल्या व सलगरा दिवटी येथील प्रा.आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेल्या एका शिपायाला कोरोना झाल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले.

या बद्दल अधिक माहिती अशी की, मुळचे जवळगा (मे.) येथील रहिवासी असलेले पण सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीची वय ४७ वर्षे यांची ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’ ८ एप्रिल रोजी पॉजिटीव्ह आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली असून, सलगरा बरोबरच जवळगा येथील नागरिकांमध्ये सुद्धा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सलगरकरांनी शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याबरोबरच सध्या चालू असलेल्या लसिकरणास चांगला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णालयात कोरोना पॉजिटीव्ह व्यक्ती आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी सुद्धा पंचक्रोशीतील इतर गावांचा प्रतिसाद चांगला असून, आम्हाला अपेक्षित असा प्रतिसाद सलगरकरांकडून मिळत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांनी पत्रकार प्रतिक भोसले यांच्याशी बोलताना सांगितले. तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करत लसीकरणास सहकार्य करावे, लसीकरणाच्या संदर्भात विविध प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र त्या मध्ये कसल्याच प्रकारचे तथ्य नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या वैद्यकीय आधार नसलेल्या अफवांना बळी पडू नका.
असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांनी केले आहे.

दरम्यान योग्य ती खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरच्यांची भेट घेऊन त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना देऊन क्वारंटाईन केले आहे. व पुढील सुरक्षेसाठी संबंधित व्यक्तिला तुळजापूर येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती सलगरा दिवटी प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांनी दिली.

Related posts