Blog

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक …

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

=======================================================================================================

भारतीय संस्कृती ही जनाच्या मनमना च्या विचारावर, विश्वासावर आधारलेली आहे प्राचीन काळापासून वाचनाला महत्त्व देणारे “वाचाल तर वाचाल” अशी शिकवण देणारे धर्म-अधर्म सत्य-असत्य न्याय-अन्याय जाणणारी व त्याचा उपयोग समाजासाठी करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती होय.” वाचन हे मनाचे खाद्य आहे “असं सांगत संत-महंताणीसुद्धा वाचनाचे महत्त्व ,उपयोगिता, मूल्य, वाचनाचे सातत्य व वाचनाची प्रदीर्घता स्पष्ट केली आहे .नाही म्हंटलं तरी लहान मूल म्हणजे चिखलाचा गोळा ! त्याला द्यावा तसा आकार देता येतो ,घडवावेत असे घडविता येते एखाद्या कुंभारा प्रमाणे, चिखलाला तुडवून तुडवून आकार देतो ,एखाद्या मूर्तिकारा प्रमाणे, मूर्तीत जीव ओतावा तसा, गरम लोखंडावर घाव घालावा तसा आणि वाटेल तसा आकार प्राप्त करावा परंतु आजच्या विद्यार्थ्यांच्या मनावर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा, दबावतंत्र ,वाढत जात आहे पाश्चात्य संस्कृतीचे विचित्र भूत बालकांच्या मनाला चिकटलेले आहे माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी आधुनिक साधने व इंटरनेटचे जाळे विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करीत आहे

त्याचा तात्पुरता वापर विविध प्रकारचे गेम याच्या विळख्यात आजचा विद्यार्थी सापडत आहे व हळूहळू वाचनापासून दुरावत चालला आहे! अगदी स्पष्टच आणि खरं सांगायचं म्हणजे आजच्या विद्यार्थ्याला सगळ्या गोष्टी सगळे ज्ञान हे आपोआप कष्टाविना व घर बसल्या मिळत आहे आजच्याच काळाचा विचार केला तर या विविध यांत्रिक साधनांमुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळ ही समस्या पुढे येते अगदी बालवयातच म्हणजेच पहिली ते चौथीपर्यंतचा टप्पा हा वाचन, वाचन रुजवणूक करण्याचा पहिला टप्पा मानला जातो बाल वयातच विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचायला देणे ,नेते, महान समाजसुधारक, विचारक, तत्त्वज्ञ ,लेखक, कवी ,योद्धे यांचे जीवन चरित्र सांगितले पाहिजे व वाचनाची गोडी लावली पाहिजे मुलांवर संस्कार घडवत असताना पालकांनीसुद्धा अत्यंत जागरूक व जबाबदारीने वागले पाहिजे मुलांना जन्म देणे आणि नंतर शाळेच्या हवाली करणे इतकीच आपली जबाबदारी समजून नये!”

जाग यावी समाजाला व्हावा माणूस जागा, शहाणा बंद करा ही अमानुष व्यसने वाचू आपण उपयुक्त पुस्तके” राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे उदाहरण आपल्या समोर आहे लहानपणी गांधीजींनी सत्य हरिश्चंद्र तारामती पुस्तक वाचले होते त्या वाचनामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले भारतीय वाचन संस्कृती ही फार प्राचीन कालीन आहे रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद ,उपनिषदे 18 पुराण, कुराण ,बायबल, ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा ही पवित्र ग्रंथ भारतीय संस्कृतीचा आत्मा आहेत जी जगाला वंदनीय आहेत बालवयातच वाचनाची आवड निर्माण करावी लागते त्यात शाळे सोबतच पालकांचा सिंहाचा वाटा असतो काळाचे परिवर्तन झाले, समाज बदलला, माणसांचा समूह बदलला, विचारांचा समूह बदलला पूर्वीच्या काळी मूल्यशिक्षण हे आपोआपच घराघरातून मिळत असे एकत्र कुटुंब पद्धती आणि घरातील प्रेमळ मोठी माणसे आजी आजोबा यांच्या प्रत्यक्ष वागण्यावरून संस्कार घडत असत घराघरातून पोती, पुराण रामायण ग्रंथांचे वाचन होत असे त्या वाचनाचा सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांच्या बालमनावर होत असे

गावोगाव गल्ली गल्ली पारायणे होत असत म्हणजेच ग्रंथवाचन चालत असे त्यामुळे लहान मुले आपोआप वाचनाकडे वळत असत आज आपल्याला त्याच धर्तीवर चावडीवाचन सुरू करण्याची वेळ आपल्यावर आली आहे मुळात हाच प्रश्न सर्वांना सतावतो आहे की विद्यार्थ्यांचा वाचन कल इतका कमी का झाला असावा? आज वर्गात प्रवेश केल्यानंतर वाचन म्हटलं की पन्नास टक्के विद्यार्थी नाक मुरडताना दिसतात व मुलांचा कल हा टीव्ही व्हिडिओ गेम विविध ॲप पाहण्याकडे वळतात वर्गात प्रवेश करताच सर टीव्ही, सर टीव्ही दाखवा चा सूर ऐकू येतो पूर्वीच वाचन वेड संपूण मोबाईलचे वेड पुढे आलं आहे वाचनाने माणूस मोठा होतो मोठा म्हणजे फक्त शरीराने नव्हे बुद्धीने, मनाने ,विचाराने, कल्पनेने, भावनेने विश्वास व आत्मविश्वासाने आत्मबलाने मोठा होतो जेव्हा तो आत्मबलाने मोठा होतो तेव्हा त्याच्यासाठी जगात काहीच अशक्य नसते

खरंतर मुले ही संवेदनशील असतात प्रश्न असा आहे की किती पालक आपण स्वतः मुलासमोर पुस्तके वाचतात खरं तर मला वाटते आपण सर्वांनी प्रथम पुस्तके वाचण्याची आवड निर्माण केली पाहिजे स्वतः पुस्तके वाचली पाहिजेत, दिवसा मधून किमान एक तरी तास वाचन केले पाहिजे ,वर्तमानपत्र स्वतः घरी विकत आणली पाहिजेत व वाचली पाहिजेत विविध चरित्रे ,मासिक, नियतकालिके, साप्ताहिक, मातृभाषा व विविध भाषेतील गोष्टीरुप ऐतिहासिक वाचन केले पाहिजे तरच त्याचा प्रभाव प्रेरणा उत्साह विद्यार्थ्यांना वाटेल निसर्गतः मुले ही हळूहळू शरीराने मोठी होतात पण फक्त मोठी होण्यापेक्षा संस्कारांची जडणघडण होत मोठी होणं हे महत्वाचं आहे ग्रामीण भागापेक्षा शहरी जीवन हे खूपच व्यस्त असते सर्व जण आपापल्या कामात असतात शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या मुलांच्या संस्कारावर फार मोठा फटका बसला आहे कारण मुलांना मिळणारे प्रेम वात्सल्य नैतिक मूल्य शिकवण याला घरात मोठी माणसेच उरली नाहीत ते कुठेतरी स्वतंत्र किंवा वृद्धाश्रमात राहतात आपली मुलं विद्यार्थी या ना त्या कारणांनी आपल्या हातून निसटून पुढे जाऊ नयेत गैर मार्गाकडे वळू नयेत म्हणून आपल्याला वाचन संस्कृतीची रुजवणूक करावी लागेल भारताचे भविष्य घडविण्याचे सामर्थ्य आजच्या तरुणाईत आहे

देशाचा मुख्य कणा म्हणजे आमचा विद्यार्थी आहे उद्याचे भविष्य योग्य संस्काराविना तो दिशाहीन बनत चालला आहे त्याला वेळीच आवर घालून वाचनाची रुजवणूक केली पाहिजे वाचनाचा मुख्य गाभा घटक म्हणजे ग्रंथालय होय प्रत्येक शाळेत गावा-गावात गल्ली मोहल्ल्यात ग्रंथालय होणे अत्यंत आवश्यक आहे ज्याप्रमाणे दवाखाना तिथे मेडिकल दुकान उपलब्ध असते अगदी तसेच शाळा तिथे वाचनालय ग्रंथालय असणे आवश्यक आहे व प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याचा सदस्य करून वाचनाची आवड व रुजवणूक करता येते प्रत्येक विद्यार्थ्याला अल्पदरात पुस्तके वाचण्यास उपलब्ध करणे हे शाळा व सरकारचे महत्त्वाचे काम आहे गल्लोगल्ली चहाच्या पानाच्या टपऱ्या उभा करण्यापेक्षा दारूची दुकाने उघडण्यात पेक्षा वाचनालय सुरू करावीत जेणेकरून मुले व्यसनाकडे वळणार नाहीत व जास्तीत जास्त वाचनाची आवड निर्माण होईल वेळोवेळी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करावे विशेष ताहा पालकांनी स्वतः आपल्या घरीच पुस्तकांचे छोटे ग्रंथालय सुरू करावे व मुले वाचण्यास प्रवृत्त करावेत समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन वाचन चळवळ सुरू करावी तरच वाचनाची रुजवणूक विद्यार्थी व पालकांमध्ये होईल

किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः वाचन वेळ निर्माण करण्याची गरज आज आहे चांगली चरित्रे, सकारात्मक विचार ,महान व समाजसुधारकांचे कार्य, वाचल्याने त्यांच्याकडून वाचन प्रेरणा मिळते वाचन प्रेरणा दिन साजरा करून विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके, धाडसी कथा, सैनिक व युध्द, यांची पुस्तके धाडसी कथा सैनिक व युध्दात दिलेले बलिदान यांची पुस्तके याकडे आकर्षित करून त्यांना वाचन वेड लावता येते व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी रुजवणूक होण्यास मदत होईल आधुनिक शिक्षण प्रक्रियेत वाचनाला, वाचन प्रकल्पाला उचित स्थान दिलेले दिसत नाही फक्त ई-लर्निंग डिजिटल शिक्षणाने जग जवळ येत आहे पण माणसामाणसांमधील संवाद दुरावत चालला आहे माणूसपण हरवत चालला आहे त्यासाठी कुठेतरी वाचनाचे महत्त्व समाजाला समजावून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे वाचन जगत या सदरात वाचन प्रकल्प कार्ड, वाचन चित्र प्रकल्प, तयार करून वाचनाची गोडी विद्यार्थ्याला लावता येते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनवेड,

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा, शिक्षण सम्राट महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणा बद्दल व वाचना बद्दलचे अमृतमय विचार विद्यार्थ्यांपुढे मांडून त्यांना वाचता केले पाहिजे ज्याप्रमाणे मानवाला अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे वाचन ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे वाचन कॉर्नर विद्यालयांमध्ये स्वतंत्र वाचन कॉर्नर तयार करून त्यात विविध क्षेत्रातील विचारवंतांची पुस्तके फोटोसह एका विशिष्ट रचनेमध्ये तयार करून विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करता येते वर्तमानपत्रातील विशेष कात्रणं विज्ञान खेळ भाषा इतिहास इत्यादी आगळावेगळा उपक्रम पालकांनीसुद्धा आपल्या घरी तयार करून आपल्या पाल्यांना वाचनासाठी प्रवृत्त करता येईल ।🙏🏻🙏🏻
धन्यवाद

Related posts