Blog

न्याय सर्वोच्चपरी, श्रेष्ठ!.

सदा सर्वदा विशुद्ध ,मनोमनी न्याय जागो!,
अन्याय प्रवृत्ती,स्थळी, काळी, आकाशी समुळ नष्ट होवो!!
पृथ्वीच्या चारही बाजूने, आकाश पहुडले असल्याचे दिसते.आणि आकाश नाही, असे सांगणारा कोणीही कोणाला,आजुन पर्यंत भेटला नाही. आणि भेटणे असंभव आहे.आकाशात एक सूर्य आणि चंद्रा बरोबर असंख्य तारे लुकलुकतांना सारेच पाहतात.अंध पाहु शकत नाही, पण बहुसंख्य जे सांगतात, ते सत्य मानुन, तेही मानतात. म्हणजे, अंधालाही न पाहता,सत्य वाटावे अशी, विचार धारा म्हणजे न्याय होय! आणि असा न्याय सर्वोच्चपरी श्रेष्ठ आहे. “अंधा कानुन “अशी भार्वना,याच अर्थाने होते की, न्याय करण्यार्याला, न्याय प्रक्रियेत, स्वतःला अंध समजुन,सत्याचा शोध घ्यावा लागतो.आणि वैज्ञानिक दृष्टी ठेवून, सर्वोत्तपरी मान्य असा निवाडा करावा लागतो, म्हणजे, न्याय प्रक्रियेत जे जे अशुद्ध आहे, मानवी जीवनासाठी घातक आहे, ते ते गाळून, जसे आपण अशुद्ध पाणी गाळून,Purified पाणी करून, मानवास पिण्यायोग्य करून, जीवनात उपयोगी आणतो, त्या प्रमाणे जेजे आचार विचार मानवासाठी, अशुद्ध आहे ते ते गाळून,ते विशुद्ध करण्याचे महान कार्य, न्यायालयाचे, न्यायाधिशाचे आहे, तेवढेच शिक्षकांचे सुद्धा आहे. विशुद्धता संस्कारातीत करण्याचे काम जसे, शिक्षकाचे आहे, तसेच ते संस्कार, प्रमाणित करण्याचे काम, न्यायाधिशाचे आहे. म्हणजे समाजाची सांस्कृतिक जबाबदारी, ही जेवढी शिक्षकांची, बालकांना शिकवितांना,घडवितांना जबाबदारी आहे, तेवढीच जबाबदारी, समाजाचे, राष्ट्राचे स्वास्थ्य कायम राखण्याची जबाबदारी ही न्यायाधिशाची आहे. न्याय प्रवृत्तीच बिघडली, चुकीच्या पायावर उभी असेल,तर समाजाचे,कोणत्याही राष्ट्राचे स्वास्थ्य (मानसिक, शारीरिक) सामान्य राहणे अशक्य आहे. म्हणून सरकारची,शासन प्रशासनाची आणि समाजातील लोकांची जेवढी, जबाबदारी आहे, त्या पेक्षा किंचित अधिक, ही न्यायाधिशाची, न्यायालयाची आहे. म्हणजे राज्य घटनात्मक कर्तव्य आणि हक्क,न्याय सर्वांना, समान पातळीवर ठेवण्याची, सर्वप्रथम जबाबदारी ही समाजाची, आणि शासन, प्रशासनाची आहे;आणि ती जबाबदारी जर, शासन प्रशासन आणि समाजाने तंतोतंत पाळली तर, न्यायाधिशाची किंवा न्यायालयाची आवश्यकता नाही, तर वकीलाची आवश्यकता कधीच भासणार नाही. हेही तेवढेच सत्य आहे. कोणत्याही प्रकारच्या वकीली मुक्त समाज हा, सुशिक्षित, सुसांस्कुत समाज आणि राष्ट्र होय. पण जगात कोणत्याच प्रदेशात, कोणत्याच, युगात, सत्य युगात सुद्धा, वकीली मुक्त समाज नसल्याने, न्यायाधिश
व न्यायालयाची आवश्यकता आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.
मानवा जवळ, बुद्धी आहे. मन आहे. आणि बुद्धी आणि मन तृष्णेने, व्याप्त आहे. या एकमेव कारणास्तव, मानवी मनात आग आहे. भूक आहे. आणि भूक (मानसिक, शारीरिक) ही महाभयानक व्याधी आहे. त्या व्याधीवर एकमेव, उपाय म्हणजे, सर्वोत्तपरी, सर्वांना समान न्याय आणि समान संधी होय. शिक्षण व संस्कार हे, महा औषधी आहे की, ते मानवी, मानसिक आणि शारीरिक व्याधी दूर करू शकते. परंतु शिक्षण आणि संस्कारात अशुद्धता असेल, तर न्यायाधिशाची, न्यायालयाची आवश्यकता आहे. पण अशुद्ध शिक्षण पद्धतीत आणि संस्कार क्षमतेत जर अशुद्ध ता असेल तर, सुसांस्कुतिक,विशुद्ध न्याय
कसा निपजले? हा भयानक प्रश्न,जगापुढे फार प्राचीन आवासुन आहे, आणि या एकमेव कारणास्तव, मानव दुःखी आहे. असे भगवान बुद्धाचे मत आहे.आणि हे लक्षात घेऊनच, भगवान बुद्धाने स्पष्ट केले आहे की, शिक्षक आणि न्यायाधिश हा कुबुद्धीचा नसावा, तर सुबुद्धीचा असावा, तरच समाज राष्ट्रात चारित्र्यवान माणसे निपजुन, प्रज्ञा जागृत राहल्याने, अन्याय प्रवृत्ती समुळ नष्ट होते. पण आपली संस्कृती, वैदिक हिंदु संस्कृती,जीचा फार गर्वाने वाजागाजा केला जातो, ती दोषयुक्त आहे म्हणूनच, समाज राष्ट्रात, अन्याय प्रवृत्ती बळकाऊन, सदैव असहिष्णुत वातावरण कायम, होत रहातांना दिसते त्याचा परिपाक खोटे बोलणे, पण दाटुन बोलणे, व्यभिचार,शिवाशाप करणे,चोर्या ,नशा, बलात्कार, खुन
खराबे, हत्या,आत्महत्या, लिंचिग सारखे प्रकार घडतात आणि त्यातुन,अन्याय प्रवृत्ती वाढत राहुन, भ्रष्टाचाराचा बोलाबाल इतका प्रभावी होतो की, तोच सामाजिक सांस्कृतिक न्याय वाटाला लागून, तो शिष्टाचार असा बनतो की, त्याची कीड समाजा बरोबरच, न्यायाधिसाला, न्यायव्यवस्थेला कधी आणि केव्हा लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे न्यायालयाचा जीवंतपणाच नष्ट होऊन, लोकशाही पोकळू शकते, म्हणून,
अधुन मधुन, जशी घरा दाराची संपूर्ण साफसफाई करत राहावी लागते, तेव्हा दीवाळी दसरा साजरा करण्यात मजा येते, तोरणे, दीप लावण्यात आनंद मिळतो, तसाच राष्ट्रहित सर्वोतोपरी श्रेष्ठ लक्षात घेऊन, अंतर बाह्य राष्ट्र संरक्षणार्थ, न्यायालयिन कार्य पद्धती आणि भ्रष्ट न्यायाधिशाची साफ सफाई आवश्यक आहे. आणि त्या करिता, जर जाणिव कुबुद्धी विचारातुन एखाद्यी न्यायाच्या ऐवजी, अन्याय प्रगट होत असेल तर अशा न्यायाधिशावर कार्यवाहीचे प्रोसेसिंग आवश्यक आहे. असे केल्यास न्यायालय आणि न्याय जीवंत राहुन, राष्ट्र बलशाली बनेल. कारण,न्याय जीवंत तर,लोकशाही जीवंत आणि लोकशाही जीवंत तर, देश जीवंत असा तो खेळ आहे.
अलिकडे, न्याय व्यवस्थेवर कडाडून सामाजिक टिका होत आहे आणि त्याचे कारण उघड आहे. आणि त्या पैकी सर्वात महत्वाचे म्हणजे, न्याय प्रक्रियेत उशिर होणे, मृत्यू नंतर न्याय जसा अर्थहिन आहे तशाच उशिरा मिळालेला न्याय सुद्धा, एक प्रकारचा अन्यायच असतो. पण उशिरा कां होईना? पण न्याय मिळाला, त्यातच सर्वसामान्य मनुष्य, सुखाऊन जाऊन समाधानी होतो, पण जे सर्वसामान्यापेक्षा थोडा वेगळ्या प्रकारे विचार करतात उदा. अॅड.ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण सारखे विचारवंत, ज्यांना, राष्ट्राची काळजी आहेच, सोबत न्यायालयाची ईज्जत जी दिवसेंदिवस घसरत आहे, चुकीचे, दबावाखालती, निर्णय देशापुढे येत आहे उदा. ज्या रामाचा जन्म झाला नाही अशा नुसत्या कथेच्या आधारावर आणि श्रद्धेवर, ज्या प्राचीन साकेत आधुनिक अयोध्या जेथे खोदकामात,प्रत्यक्षात बुद्ध विहार आणि बुद्ध मुर्तीया मिळाल्या त्याचा साधा विचार न करता, चौकशी न करता, किंवा तसे आदेश न देता, जमीनीत नेमके काय दडलेले आहे ?हे प्रत्यक्षात न पाहता, त्याचा रिपोर्ट
केद्र सरकार कडून न मागता, शुद्ध बौद्ध धर्मियांना आपले मत मांडणारी अपील लक्षात न घेताच खोदकामापूर्विच अयोध्या राम मंदीराचा निर्णय हा ठामपणे, एकतर प्रधान मंत्री मोदी यांचे दबावाखालती घेतला गेला किंवा, कुबुद्धीतुन प्रस्तावला असे म्हणण्यास जागा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार, भगवान बुद्धा शिवाय, भारतीय संस्कृती, ही असुन नसल्या सारखी आहे किंवा संस्कृतीला पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही. अशा भगवान बुद्धाला म्हणजे सत्याला, नाकारून, असत्य काल्पनिक रामाला महत्त्व देणारा निकाल, हा स्पष्ट करतो की, न्यायालय आपली प्रत, ईज्जत जागतिक स्तरावर गमावत आहे की काय? या श्रेष्ठ विचारातुन प्रशांत भूषण यांनी केलेली टिका, समीक्षा जी जगजाहिर आहे की, भ्रष्ट आचार नीतीमुळेच आजुनही देशात ब्राह्मणवाद आणि त्यांनी पेरलेला दैववाद तसेच, जातीयवाद जो राष्ट्राला क्षणोक्षणी खोकला, पोकळ करीत राहतो तो समुळ नष्ट करण्यासाठी,73 वर्षात न्यायालय अपयशी ठरले आहे आणि ज्या कारणास्व परकीयांची गुलामगिरी भारताला भोगावी लागली, ते कारण आजुनही देशात जीवंत आहे, ते न्यायालया चे अपयश नाही तर कोणाचे? असे असंख्य प्रश्न देशात उभे आहेत. असंख्य अशा कितीतरी, प्रश्न, अपील्स आजुनही प्रलंबित आहे. ते निकालात निघावे, राष्ट्रातील भ्रष्टाचार आणि आतंकवाद सारखे कृतकृत्य निपटून निघावे म्हणून भारतीय राज्य घटनेने, बोलण्याचा, विचार करण्याचा, समीक्षा करण्याचा आणि टिका टिपणी करण्याचा अधिकार, लेख लिहिण्याचा अधिकाराचे स्वातंत्र्य उपभोगले तर न्यायालयाची बेअदबी कशी?
उद्या समजा संपूर्ण असे लोक, रस्तावर न्यायासाठी, न्यायालयलाच्या विरूद्ध, रस्त्यावर आला तर प्रशांत भूषण प्रमाणे सर्व भारतीयांना गुन्हेगार, न्यायालय ठरवेल किंवा कसे? असाही एक प्रश्न येथे उभारतो. व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव करून देणे हे,त्या न्यायालयाचे निश्चित काम आहे जे न्यायालय किंवा, न्यायाधिश चुकाच करीत नाही. आणि जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, लगाम लावण्यासाठी, न्यायालय शिक्षा देत असेल तर सर्वोच्चन्यायालयाचे चार न्यायाधिश जे जनतेच्या न्यायालयात काही एक काळापूर्वी, मुख्य न्यायाधीशाविरूद रस्तावर आलेले होते, त्यांची सुटका न करणे, त्यांचे कान न टोचणे, समीक्षा करणार्या न्यायाधिशा विरूद्ध, कोणतिही कार्यवाही न करणे अनाकलनीय आहे? आणि जाणीव ,जर कोणी कोणत्याही प्रकारचा सुबुद्धीतुन प्रगटन न्यायाविरूद्ध ,कुबुद्धीने आवाज काढत असेल, तर तो निश्चित, शिक्षेस पात्र आहे. ही बाब निश्चित बरोबर आहे की, न्यायालयीन कामकाज परिपूर्ण होण्यापूर्वी, अन्यायग्रस्तानी, वकीलांनी किंवा पत्रकारांनी, किंवा लोकांनी, राजकारणी आणि मंत्र्यांनी सुद्धा, जाहिर अशा केसेसला प्रसिद्धी देणे योग्य नव्हे, कारण त्याचा निरपेक्ष न्याय निकालावर, परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकास न्याय वेगळा आणि दुसर्यास न्याय वेगळा अशी परिस्थिती चवाट्यावर येते तेव्हा, अन्यायग्रस्त लोक आवाज उठवणार हेही तितकेच खरे आहे.
न्यायालय हे लोकशाहीत प्रमुख खांब असुन, त्याचा कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही. याची खबरदारी घेणे जेवढे समाज मनाला, देशातील नागरिकांना आवश्यक आहे, त्या पेक्षा किंचित अधिक काळजी घेणे, हे स्वयं न्यायाधिशांना आवश्यक आहे असे प्रामाणिक मला वाटते. न्याय, न्यायालयात आणि न्यायमूर्तीच्या मनात कुबुद्धी निर्माण झाली नाही, भ्रष्ट आचार विचारातुन न्यायालयाचा न्याय प्रगटला नाही आणि न्या करतांना श्रीमंत गरीब, ब्राह्मण शुद्र, धर्म जात असा भेद न करता, विशुद्ध पुरावे,बयान आणि ऐतिहासिक सत्य यावर आधारित, न्याय प्रगटत राहुन, न्यायालयापुढे सर्व समान, ना भाऊ, ना ताई, सर्व समान सूदृष्टी अशी राहली आणि विभेदा शिवाय देशातील,विविध संस्था, मंत्रालय, शासन प्रशासन आणि न्यायालयात न्याय झाला तर मला नाही वाटत कोणी प्रशांत भूषण, रस्तावर येऊन, अवमान करण्याची हिम्मत करील?
सुष्ट विचार आणि आचार कर्तृत्ववानी सत्यावर आधारित न्यायाविरूद्ध ,फक्त माफीया, कलंकित ,भ्रष्ट व्यक्तीच पुढे येऊ शकतो, सभ्य व्यक्ती नाही. आणि ज्या अर्थी न्यायालया विरूद्ध,दिवसेंदिवस समाज मनात संभ्रम निर्माण होत आहे, त्या अर्थी कुठेतरी न्यायालयात कमी आहे? असे वाटणे स्वाभाविक आहे. आणि ती कमतरता फक्त न्यायाधिशस दूर करू शकतात. दुसरे कोणी नाही. दुसर्याने कितीही जागवले कोणास, पण कोणी जागु इच्छित नसेल तर अशास, ढोंगास कोणीही जागे करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. पण झोप णार्याला,डुलक्या देणार्या ड्रायव्हरला धक्का दिला नाही. त्याच्या चेहर्यावर पाणी शिंपडले,नाही तर ऍक्सिडेंटची संभवना नाकारता येत नाही, तो होऊ नये,म्हणून
लोकशाही जिवंत राखण्यासाठी तर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर,यांनी बोलण्याचा, विचार प्रगटण्याचा, समीक्षा करण्याचा, लेख लिहिण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योजना केलेली राज्य घटनेत योजना केली असुन, त्याच्या सर्वोतोपरी सुरक्षतेची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाला सोपविलेली आहे, जेणे करून, स्वातंत्र्य पायदळी तुडविले जाणार नाही आणि हुकुमशाही प्रवृत्ती वर डोके काढणार नाही. आणि भारतात, पुन्हा नवीन नेपोलिअन
जीवंत होणार नाही. प्रशांत भूषण ते महान कार्य करीत आहे .असे वाटणे साहजिक आहे. भारतीय स्वातंत्र्य 70-73 वर्षाचे पोक्त होत असतांना, सामाजिक, राजकिय, आर्थिक, धार्मिक आणि शैक्षणिक न्याय प्रक्रियेतील बालीशपणा,अंध भक्तांची फोज बरोबर नाही.
नव्हे; स्वतःचा हसा होणार नाही अशी खबरदारी घेऊन, प्रगटणारे न्याय, निर्णय ,शासन जी आर. “मानवीय दृष्टीने सन्मानीय ” हाच , स्वतःची अब्रू स्वतः राखण्याचा सर्वोच्च न्याय होय.कारण, दूसर्यापेक्षा स्वतःची अब्रू आणि सुरक्षा, स्वतःच सक्षमपणे राखु शकतो. दुसर्याच्या भरोश्यावरील संरक्षण हे जसे धोक्याचे असते तेवढीच,दुसर्यावर अवलंबित अब्रू ही सुद्धा धोक्याची असते, हे तेवढेच सत्य आहे.या निमित्ताने मी नक्कीच सांगु इच्छितो की, परकीयांपासुन आपण जेवढे सुरक्षित आहोत तेवढे,आपल्या भारतीयांपासून, भारतीय सुरक्षित नाही, यासं, जेवढे दोषी राजकारणी सत्ता धिस आहे,त्यापेक्षा किंचित अधिक, न्यायपालिका आहे कारण तोच एकमेव, भारतीयांच्या मना मनात,समता आणि बंधुत्व,मैत्रीभाव पेरून स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी,अंतर्गत सुरक्षा ,सुव्यवस्था राखणारा सशक्त देह आहे.असा न्याय (देह) सर्वोच्चपरी श्रेष्ठ आहे.
बेईज्जत वही होता हैं,जो दुसरोंकी इज्जत नही करता है!
और अन्याय वही पनपता है, जॅहा न्यायालय (देह) जीवंत नही होता है!!
क्षमस्व!
प्रा. मुकुंद दखणे,यवतमाळ .9373012954.

Related posts