उस्मानाबाद  लोहारा

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा.

प्रतिक शेषेराव भोसले
लोहारा, प्रतिनिधी

२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असल्याने त्याचे औचित्य साधुन, लोहारा तालुक्यातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथे जागतिक मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला मराठी भाषेच्या विकासास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टीेकोनातून शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा.विद्यासागर गिरी यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.आर.एम.सूर्यवंशी होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.बी.एच.पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एम.एल.सोमवंशी, डॉ. एस.एस.कदम, डॉ.सी.जी.कडेकर, डॉ.व्ही.डी.आचार्य, डॉ.पी.के.गायकवाड, प्रा.आर.एस धप्पाधुळे श्री.संजय फुगटे आदींनी मोलाचे सहकार्य केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्ता कोटरंगे यांनी केले तर आभार सुरज मगर या विद्यार्थ्याने मानले.

सर्व उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे या उद्देशाने तसेच मराठी राजभाषा दिन साजरा व्हावा या हेतूने महाविद्यालयात या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

Related posts