पंढरपूर

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ६ वर्षात आ.दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले, पराभव दिसल्याने निवडणूकित डमी उमेदवार उभा केला – समाधान घाडगे

सचिन झाडे –
पंढरपूर प्रतिनिधी

शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहा वर्षात आ दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी सभागृहात व सभागृहाबाहेर सातत्याने आवाज उठवला होता, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे पराभव दिसल्याने निवडणूकित दत्ताराव सावंत नावाचा डमी उमेदवार विरोधांनी उभा करीत गावठी राजकारण करीत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षक मतदार हाणून पाडतील असा विश्वास राज्य शाळा कृती समितीचे संघटक समाधान घाडगे यांनी व्यक्त केला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असून आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यापूर्वी राजकिय पक्ष हे शिक्षक मतदारसंघात वैयक्तिक लक्ष देत नव्हते परंतु यावेळी राजकिय पक्षांनी लक्ष घालत निवडणूकित शिक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला शिक्षकांमधून तीव्र विरोध होत आहे, शिक्षकांचे प्रश्न शिक्षक चळवळीत काम करणारे आ दत्तात्रय अच्युतराव सावंत हे एकमेव उमेदवार असल्याने हेच पुन्हा निवडून येतील असा विश्वास समाधान घाडगे यांनी व्यक्त केला.आ दत्तात्रय सावंत यांनी विस-पंचवीस वर्षे सातत्याने शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत.

त्यांनी शिक्षकांचा पक्ष काहीही पाहिला नाही तर त्यांचे प्रश्न पाहून हे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यामुळे आ सावंत यांच्या सोबत सर्वच राजकीय पक्षातील शिक्षक आमच्या राज्य शाळा कृती समितीचे सदस्य आहेत. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळवून देणे, जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, अघोषित शाळा घोषित करणे , वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी सभागृहात व रस्त्यावर उतरून आ दत्तात्रय सावंत यांनी प्रयत्न केला आहे अशी माहिती संघटक समाधान घाडगे यांनी दिली.

Related posts