तुळजापूर

उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आ.कैलास पाटील यांच्याकडून पाहणी

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने समंध कळंब-उस्मानाबाद तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेल्या पिकाला मुकावे लागत आहे. शेतीसह अनेक प्रकारच्या जीवित व वित्त नुकसानीला लोकांना सामोरे जावे लागत आहे. अशातच हवामान खात्याने तर अतिवृष्टी चा इशारा दिला आहे. अशा संकटाच्या काळात कळंब-उस्मानाबाद चे आमदार मा. कैलास (दादा) पाटील हे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मुसळधार पावसामुळे कळंब-उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे उस्मानाबाद-कळंब तालुक्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेकांच्या पिकांचे, शेतीचे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आ. मा. कैलास (दादा) पाटील यांनी आज अंबेजवळगा ता.उस्मानाबाद येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीच्या भरपाई सोबतच शेतकऱ्यांना मानसिक आधार देणे हे आपलं कर्तव्य आहे या अनुषंगाने यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून आ. कैलास पाटील यांनी त्या शेतकऱ्यांना धीर दिला.

शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दक्षता घ्यावी व सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना यावेळी आ.मा. कैलास (दादा) पाटील प्रशासनाला तसेच उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गाला दिल्या.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, जि.प.सदस्य नितीन शेरखाने, विभागप्रमुख सौदागर जगताप, अंबेजवळगा सरपंच आनंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव, मंडळ अधिकारी श्री.नन्नवरे, विश्वजित सारडे, कलीम शेख, बंडू यादव, पोपट खरात, मनोज बिरंजे, अमोल बिरंजे, ओंकार सारडे, संजय नलावडे, ज्ञानेश्वर गुरव, पिंटू बिरंजे, पैगंबर मुजावर, हनुमंत हिप्परकर तसेच शेतकरी उपस्थित होते.

Related posts