उस्मानाबाद 

आ. कैलास पाटिल धावले रुग्णाच्या मदतीला ; ४० आँक्सीजन बेड तयार…!

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव (उस्मानाबाद) शहरातील जिल्हा रुग्णालयात आँक्सीजन बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार कैलास पाटिल यांच्याकडे तक्रार केली होती. परिस्थिती चे गांभिर्य लक्षात घेता ताबडतोब आ. कैलास पाटील यांनी धाव घेत प्रशासनाला सूचना करत शेजारील रुग्णालयात त्या रुग्णाला बेड उपलब्ध करून दिले.

धाराशिव (उस्मानाबाद) शहरातील जिल्हा रुग्णालयात आँक्सीजन बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार कैलास पाटिल यांच्याकडे तक्रार केली होती. परिस्थिती चे गांभिर्य लक्षात घेता तात्काळ आ. कैलासदादा पाटील यांनी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालयातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बोलावुन लागलीच जिल्हा रुग्णालयाच्या जवळच असलेल्या नेत्र रुग्णालयातील शिल्लक ४० बेड होते त्या बेडवर आँक्सीजनची व्यवस्था करुन रुग्णांना ते बेडही लगेच उपलब्ध करुन दिले. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड आमदार कैलास पाटलांच्या या प्रयत्नामुळे थांबली.

सध्या आमदार कैलास पाटिल हे उस्मानाबादेतच ठाण मांडून बसलेले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागासोबत ते वेळोवेळी सुचना देऊन दुरध्वनीवरुन आढावा घेत आहेत दरम्यान त्यांनी काल उस्मानाबाद व कळंब येथील रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य विभाला रुग्णांची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना आ. कैलासदादा पाटील म्हणाले की, सध्या रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरीकांनी विनाकराण घराच्या बाहेर फिरु नये प्रशासनाच्या आदेशाची नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे जनतेला आवाहन केले आहे. रुग्णासाठी आणखीन बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

Related posts